बारामती शहर पोलिसांकडून मध्यरात्री झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा उघड - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 3, 2021

बारामती शहर पोलिसांकडून मध्यरात्री झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा उघड

बारामती शहर पोलिसांकडून मध्यरात्री झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा उघड
बारामती(संतोष जाधव):- दिनांक 2 डिसेंबर 21 रोजी भिगवण येथील हॉटेल निसर्ग चे तीन बेटर काम संपल्यानंतर त्यांना बाहेर फिरायला मिळत नाही म्हणून रात्री साडेबारा वाजता भिगवन वरून बारामती करता फेरफटका मारण्यास निघाले बारामती येथे न्याय मंदिरासमोर आल्यानंतर त्यांना दोन लोकांनी अडवले त्यांना हत्याराचा धाक दाखवून पैशाची मागणी केली परंतु ते वेटर असल्याने त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते नंतर त्या दोघांनी त्या तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळेस त्यातील दोन जण पळून गेले त्यातील पवन कुमार प्रथम लाल वय 22 वर्ष मुळ उत्तराखंड येथील असणाऱ्या वेटरला त्या दोन आरोपींनी पकडून ठेवले तसेच त्यांच्या ताब्यात असणारी डिस्कवर मोटर सायकल एम एच सोळा एएक्यू 32 95 ही सुद्धा बळजबरीने चोरून नेली मोटरसायकल आणि सदर पवन कुमार यांना एका तालमीत घेऊन ते दोघे गेले व त्याला दोराने खांबाला बांधून ठेवले व त्याला सोडवण्यासाठी इतर पळून गेलेल्या दोघांकडून किंवा मालकाकडून पैसे मागून घेण्यास त्याला सांगितले. परंतु सदर वेटरकडे कोणाचाही नंबर नसल्याने तू काहीही करू शकला नाही नंतर दोन-तीन तास त्याला डांबून ठेवल्यानंतर आरोपी यांचा डोळा लागल्यानंतर सदरचा फिर्यादी पवन कुमार हा नजर चुकवून त्याने दोर सोडला व त्या ठिकाणावरुन पळून गेला व पळून गेल्यानंतर तो भिगवणला निसर्ग हॉटेल कडे मालकाकडे गेला व सकाळी त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली की त्याला दोन लोकांनी बांधून ठेवले होते व बळजबरीने मोटरसायकल काढून घेतली व पैशांची मागणी केली. बारामती शहर पोलीस ठाणे यांनी सदर इसमास रेकॉर्डवरील आरोपी चे फोटो दाखवला असता बारामती शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असणारा बालाजी अनिल माने वय 20 वर्ष राहणार नेवसे रोड बारामती याला त्यांनी ओळखले पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिली व सदरचा गुन्हा त्याने प्रतीक दिलीप रेडे वय 20 वर्ष राहणार बारामती यांच्या सोबत केलेला आहे. बालाजी माने हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर खून घरफोडी जबरी चोरी हत्यार जवळ बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी रिमांड मिळालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख माननीय अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद पालवे. पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी बंडू कोठे, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, अजित राऊत, सचिन कोकणे, अजित राऊत यांनी केलेला आहे

No comments:

Post a Comment