आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील जेष्ठ नेतृत्व रंगनाथ रामभाऊ वाळुंज पाटील यांचे निधन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 4, 2021

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील जेष्ठ नेतृत्व रंगनाथ रामभाऊ वाळुंज पाटील यांचे निधन

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील जेष्ठ नेतृत्व रंगनाथ रामभाऊ वाळुंज पाटील यांचे निधन 

लोणी धामणी (वार्ताहर -कैलास गायकवाड दि.4:- आंबेगाव  जि. पुणे. तालुक्यातील पूर्व भागातील, जुने जाणते वाळुंजनगरचे  जेष्ठ कार्यकर्ते रंगनाथ रामभाऊ वाळुंज पाटील वय 85 यांचे आज शनिवार सकाळी दहा वाजता, वार्धक्या मुळे निधन झाले. लोणी व लोणी परिसरातील एक धाडसी व अभ्यासू, व्यक्तिमत्वअसणारे, लोणी गावचे अकरा वर्ष सरपंच भूषविले होते. तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक म्हणून काम पहिले होते. लोणी गावच्या विकासात मोठे योगदान आसनारे, राजकीय गाढा अनुभव  व लोकमानसात लोकप्रिय धाडसी,  हजरजबाबी, अभ्यासू, ग्रामीण भाषा चे वलय असलेले वक्तृत्व, परिपूर्ण नेता अशी त्यांची ओळख होती. वाळुंजनगर चे पण सरपंच म्हणून त्यांनी काम पहिले होते. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते होते त्यांच्या जाण्याने पक्ष आणी पूर्व भागातील  या नेतृत्वाची उणीव नेहमी जाणवत राहील. आर आर. या नावाने ते राजकारणात परिचित होते.

No comments:

Post a Comment