भरुका फायनान्स व एजंट यांनी एका व्यक्तीचा ट्रक. फायनान्स लोन नसताना बळजबरीने ओढून नेला म्हणून फायनान्स कंपनी व एजंट वर जबरी चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 27, 2021

भरुका फायनान्स व एजंट यांनी एका व्यक्तीचा ट्रक. फायनान्स लोन नसताना बळजबरीने ओढून नेला म्हणून फायनान्स कंपनी व एजंट वर जबरी चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल

भरुका फायनान्स व एजंट यांनी एका व्यक्तीचा ट्रक.  फायनान्स लोन नसताना बळजबरीने ओढून नेला म्हणून फायनान्स कंपनी व एजंट वर जबरी चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल

बारामती:- बारामती मधील एक मध्यमवर्गीय इसम तुळशीदास लक्ष्मण शिंदे वय तीस वर्ष धंदा चालक राहणार ढोर कॉलनी बारामती मोबाईल नंबर 98 22 66 84 29 याने स्वतःचा चरितार्थ चालवावा म्हणून 20 फेब्रुवारी 2020 मध्ये अमीर श्याम सुदिन पठाण राहणार भाटनिमगाव तालुका इंदापूर याच्याकडून एक दहा टायर टाटा ट्रक MH- 04-EY -3384 जुना वापरता आठ लाख 25 हजार रुपयाला विकत घेतला. विकत घेताना त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं लोन नाही असे त्याने त्याला सांगितले. व त्यानें खात्री केली त्यानंतर तुळशीराम शिंदे यांनी त्या ट्रक वर श्रीराम फायनान्स चे पाच लाख 80 हजार रुपयाचे लोन उचलले. स्वतःकडील दोन लाख 45 हजार रुपये त्यांनी भरले अशा रीतीने ट्रक विकत घेऊन तो स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या वाहनावर करू लागला व व्यवस्थित श्रीराम फायनान्स चे हप्ते भरू लागला. अचानक ऑक्टोबर 2020 मध्ये फिर्यादी सराफ पेट्रोल पंप बारामती याठिकाणी ट्रकचे काम करत असताना अमीर पठाण हा भरुका फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी घेऊन आला त्यानंतर शिंदे यांना सांगण्यात आले की त्यांच्या गाडीच्या फायनान्स चे ऑडिट करायचे आहे ते कोणत्या फायनान्स कंपनीचे करायचे हेही त्याला सांगितले नाही (अमीर पठाण बरोबर आहे म्हटल्यानंतर त्याला वाटले श्रीराम फायनान्स तेच लोक आहेत)  व काही वेळासाठी गाडी घेऊन चल असे त्याला सांगितले व त्याची गाडी सोलास्कर  यांच्या प्रगती गोडाऊन या ठिकाणी घेऊन गेले व त्या ठिकाणी सदरची गाडी त्या ठिकाणी लावण्यात आली आणि त्याला बळजबरी त्या ठिकाणावरून बाहेर काढण्यात आले तुझा या गाडीची काही संबंध राहिलेला नाही असे त्याला सांगण्यात आले व या गाडीवर भरुका कंपनीचे फायनान्स आहे असे त्याला सांगण्यात आले. शिंदे त्यांना वारंवार सांगत होता की त्याच्यावर भरुका फायनान्स कंपनीचे कुठलीही लोन नाही. त्या गाडीची संपूर्ण कागदपत्रे खात्री करूनच त्यांनी गाडी विकत घेतलेली आहे आमिर पठान ने त्याला गाडी विकत दिलेली आहे आरटीओकडून गाडी पास होऊन त्याच्यावर श्रीराम फायनान्स चे बोजा चढलेला आहे तरीही ही भारूका कंपनीने व अमर पठाण ने  काही ऐकले नाही त्याच्या नंतर त्याने पोलिस ठाण्याला एक  अर्ज केला. परंतु त्याचाही त्यांच्यावर परिणाम झाला नाही एक वर्षापासून त्यांनी गाडी भरुका फायनान्सच्या गोडाऊनला लावून ठेवली. सदरची व्यक्ती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना भेटली. त्यांनी तात्काळ शिंदे यांच्या कागदपत्रांची खात्री केली. भरुका फायनान्स कंपनी चोर सोडून संन्याशाला त्रास देत आहे अशी खात्री पटल्याने व सदर शिंदे यांच्याशी भरुका फायनान्सर काही संबंध नसताना त्यांच्या अधिकाऱ्यांनी व अमीर पठाण यांनी एक वर्षापूर्वी त्याची गाडी बळजबरीने ओढून नेली व त्याचे एक वर्षापासून उत्पन्नाचे नुकसान केले व अमीर पठान ने त्याची फसवणूक केली म्हणून त्याच्यावर काल गुन्हा दाखल करण्यात आला व सदर ची गाडी पोलिसांनी पंचनामा करून फायनान्स गोडाऊन मधून आणून पोलीस स्टेशनला लावणी आहे माननीय न्यायालयाच्या आदेशाने आता त्याला गाडी परत मिळणार आहे व या प्रकारे जर फायनान्स कंपनी चुकीच्या पद्धतीने लोकांना त्रास देत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत. एक वर्षापासून त्याचा ट्रक चुकीच्या पद्धतीने लावलेला पोलिसांनी आणल्यानंतर फिर्यादी यांनी समाधान व्यक्त केले आहे  सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब  जाधव व पोलीस अमलदार शंकर काळे मोरे बाबासाहेब चौधर हे करत आहेत

No comments:

Post a Comment