वसंतनगर टी सी कॉलेज रोड निवडणूकीच्या तोंडावर बनविणे बानपचा बाणा.! तोपर्यंत अनेकांचा रस्त्यातील खड्ड्यामुळे मोडला तरी चालेल कणा.!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 26, 2021

वसंतनगर टी सी कॉलेज रोड निवडणूकीच्या तोंडावर बनविणे बानपचा बाणा.! तोपर्यंत अनेकांचा रस्त्यातील खड्ड्यामुळे मोडला तरी चालेल कणा.!!

वसंतनगर टी सी कॉलेज रोड निवडणूकीच्या तोंडावर बनविणे बानपचा बाणा.! तोपर्यंत अनेकांचा रस्त्यातील खड्ड्यामुळे मोडला तरी चालेल कणा.!!                                             बारामती(संतोष जाधव):- 'काय बाय सांगू कुणाला सांगू माझीज मला वाटे लाज' हे गाण्याचं कडवं ऐकलं की तुम्हाला नुकताच सातारा मधील खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाषणातील हे वाक्य आठवेल, ते ही खरंच आहे म्हणा अशीच काहीशी परिस्थिती बारामती मध्ये झाल्याचे दिसून येत आहे, गेली पाच वर्षे झाली बारामती मधील वसंतनगर टी. सी कॉलेज रोडची दुरवस्था अतिशय बिकट झाली असून या रस्त्यावरून अनेक वाहने ये जा करीत असतात,शाळा,हायस्कूल, कॉलेजला जाणारा वर्ग मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर ये जा करीत असतो, अनेक वेळा या रस्त्यातील खड्ड्यामुळे अपघात झाले आहे व आत्ता सुद्धा होत आहे त्यातच केबल साठी रस्ते खोदाई केली ती ही धोकादायक झाली होती त्याच्यामुळे ऐन पावसाळ्यात गाड्या रुतून बसल्या तर काहीजणांचा अपघात झाला पण बारामती नगरपरिषद मात्र झोपेचं सोंग आणतात की काय असे वाटू लागले आहे, वारंवार लेखी, तोंडी सांगूनही या रस्त्याकडे का दुर्लक्ष केले जाते हे समजले नाही पण नको तिथे रस्ते झाले जिथे हवे तिथे होत नाही हा आजादुजा पणा का होतोय हेच समजत नाही.याबाबत लवकरच आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी सांगितले, लवकरात लवकर रस्त्याचे काम करून बारामतीमधील विकासकामात भर टाकावी जेणे करून बारामतीत बाहेरचे लोक आल्यावर उपनगरातील रस्ते बघितले की म्हणतील विकास झाला, पण येथे होत असलेली दुरवस्था पाहता नागरिकांचे मणके मोडकळीस आल्याचे दिसत आहे,आतातरी बारामती नगरपरिषदेने आपला हट्ट निवडणूक आली की रस्त्याची कामे करायची हा सोडून असेल त्या परिस्थितीत नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता त्वरित करावा अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरला नाही याची दखल मुख्याधिकारी यांनी घ्यावी. 

No comments:

Post a Comment