मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने आदिवासी हक्क अधिकार संर्वधन विषय पुस्तक प्रकाशित झाले…! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 10, 2021

मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने आदिवासी हक्क अधिकार संर्वधन विषय पुस्तक प्रकाशित झाले…!

मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने आदिवासी हक्क अधिकार संर्वधन विषय पुस्तक प्रकाशित झाले…!
  
बारामती :- परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत चे सुपे येथील राहणारे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र सर्जेराव महाडिक यांनी आदिवासी बांधवांनचे संरक्षण व योजनाचे पुस्तिका प्रकाशित केली  आहे आदिवासी समाज हा अतिप्राचीन मुळ भारतीय समाज आहे. एकेकाळी भारतीय वनसंपत्तीचा मालक असणारा हा समाज इंग्रजांच्या आर्थिक शोषणामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनत गेला. आदिवासी म्हणजे आदिकाळापासुन वास्तव्य असणारा समुह होय. आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनाचे इतर समाजाशी काही देणेघेणे नसते. त्यांचे देव, भाषा आणि चालीरीती अन्य ग्रामीण आणि शहरी लोकांपेक्षा भिन्न असतात. जंगलात राहणारे काही आदिवासी तेथील उत्पादने शहरांत आणून विकतात. भारतीय राज्यघटनेत अशा आदिवासीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना नोकरी-व्यवसायात आणि निवडणुकांत उमेदवार म्हणून त्यांच्यासाठी खास जागा ठेवल्या आहेत.भारतात ९ ऑगस्ट हा दरवर्षी आदिवासी दिवस म्हणून साजरा होतो. आदिवासी लोक भारताखेरीज जगातील अन्य देशांतही आहेत. इ.स. १९६२ साली शिलॉंगमध्ये आदिवासी समितीच्या परिषदेने आदिवासीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे- "एका समान भाषेचा वापर करणाऱ्या, एकाच पूर्वजापासून उत्पत्ती सांगणाऱ्या, एका विशिष्ट भू-प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या तंत्रशास्त्रीय ज्ञानाच्या दृष्टीने मागासलेल्या, अक्षरओळख नसलेल्या व रक्तसंबंधावर आधारित, सामाजिक व राजकीय रीतिरिवाजांचे प्रामाणिक पालन करणाऱ्या एकजिनसी गटाला 'आदिवासी समाज' म्हणताता. आदिवासींच्या भाषा सर्वेक्षणात भारतात आर्यपूर्व काळात अस्तित्वात बोलल्या जाणाऱ्या अनेक मूळ आणि प्राचीनतम बोलीभाषा आढळल्या. त्या बोलीभाषा म्हणजे ढोरी (टोकरे कोळी), कोरकू, कोलामी, खारिया, गोंडी, गोरमाटी, ठाकरी, वाघरी, वाघरामी, पारधी, देहवाली, दो, परधानी, पावरी, भिलोरी, भूमिज, माडिया, मुंडारी, संथाली, सावरा, हलबी,मावळी वगैरे. यांतील बहुतेकांना लिपी नाही, आदिवासी समूहांकडून त्या फक्त बोलल्या जातात. परंतु त्या बोलणाऱ्यांची संख्या थोडी आहे. काही आदिवासी भाषांना लिपी आहे. उदाहरणार्थ संथाली. गोंडी ही द्रविडी भाषा कुटुंबातील प्रमुख आणि समृद्ध बोलीभाषा आहे. अशा सर्व बांधवांचे हक्क अधिकार संर्वधन करण्यासाठी व त्यांच्या योजना संदर्भात पारदर्शक माहिती त्या पर्यंत पोचवण्यासाठी सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत संस्थापक अध्यक्ष भालचंद्र सर्जेराव महाडिक यांनी आदिवासी समाजाचे कायदेशीर हक्क असणारे पुस्तिका कायदेशीर सल्लागार ॲड.आमोल सोनवणे, ॲड.बापुसाहेब शिलवंत, ॲड.स्वरूप सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली १० डिसेंबर २०२१ मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने आदिवासी हक्क अधिकार संर्वधन पुस्तिका प्रकाशित केली त्यावेळी विकास कोकरे,ताराचंद गोंडे , विलास खंडाळे,पुण्यश्लोक लोंढे, चेतन गोंडे,प्रशांत विष्णू सोनवणे रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा महासचिव अविनाश किरण कांबळे,बारामती शहर युवक अध्यक्ष,अशोक शिंदे,बारामती शहर उपाध्यक्ष, सौ कांचन साक्षर भोसले रिपब्लिकन सेना पुणे  जिल्हा महिला आघाडी नेत्या मा तुषार विजय गायकवाड बारामती तालुका अध्यक्ष  साक्षर भोसले ,बारामती तालुका रिपब्लिकन सेना युवक नेते इत्यादी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व इतर  कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment