बनावट गुन्हयात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार आता पोलिसांच्या आला अंगलट..5 पोलीस निलंबित..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 17, 2022

बनावट गुन्हयात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार आता पोलिसांच्या आला अंगलट..5 पोलीस निलंबित..!

बनावट गुन्हयात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार आता पोलिसांच्या आला अंगलट..5 पोलीस निलंबित..!
 गोंदिया:जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा, अशी एक घटना घडली, गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा पोलीस ठाण्यातील पाच पोलीस शिपायांनी सालेकसा तालुक्यातील तीन लोकांवर अवैध दारू विक्रीची कार्यवाही करून त्याला बनावट गुन्हयात अडकवून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार आता पोलिसांच्या अंगलट आला आहे. स्वतः पोलीस अधीक्षक  विश्वा पानसरे यांनी या प्रकरणात सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत 5 पोलिसांना निलंबित केलं आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.ह्या संपूर्ण प्रकरणात रक्षकच भक्षक झाल्याचे दिसून आले असून सहायक पोलीस निरीक्षक अशोक धाबळे, पोलीस नायक प्रमोद सोनवणे, पोलीस नायक अनिल चक्रे, शिपाई संतोष चुटे, शिपाई मधू सोनी या पाचही जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.जाणून घ्या संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्यातील पाच पोलिसांनी डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला देशी दारू पकडली होती. त्यापैकी काही पेट्या दारू पोलीस रेकॉर्डला दाखवून इतर 8 पेट्या दारू या निलंबित पोलिसांनी आपल्या जवळील विशाल दासरिया, दीपक बासोने, भूषण मोहरे यांना चारचाकी वाहन घेऊन बोलावलं.
त्यानंतर सीलबंद केलेल्या 8 पेट्या तीनही तरुणांकडे देण्यात आल्या. 'ही महत्त्वाची सामुग्री आहे, काही दिवसांकरिता आपल्या जवळच ठेवा.' असं पोलिसांनी या तिघांनाही सांगितलं.या तीनही युवकांनी पोलिसांवर विश्वास ठेऊन ही दारू आपल्या सोबत नेली. त्यानंतर विशाल दासरिया याच्या शेतात ही दारु लपवून ठेवली. दोन-तीन दिवसांनी पोलिसांनी विशालला फोन करून एका अनोळखी इसमाला पाठवून आठ पेट्यांपैकी दोन पेट्या दारू देण्यास सांगितले.विशालने त्या इसमास दोन पेटी दारू दिली. पण तो इसम जाताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि सहा पेटी दारू जप्त करून विशालला मारहाण केली आणि त्याच्यावर अवैध दारू विक्रीचा आरोप लावून गुन्हा दाखल केला.यावेळी युवकांनी पोलिसांना समाजविण्याचा प्रयत्न केला की, ही दारू आमची नाही. तर पोलिसांचीच आहे. परंतु त्यांचे कोणी ऐकले नाही. त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी युवकांनी गृहमंत्री तसेच मानवाधिकार आयोग, आणि पोलीस अधीक्षक गोंदिया यांना पत्र लिहून या प्रकरणाची माहिती देऊन न्यायची मागणी केली.अखेर पोलिस अधिक्षकांनी ह्याची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अहवाल सादर करण्यास सांगितले.
त्या अहवालानुसार या प्रकरणी तपास करून सालेकसा पोलिसांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांनी सहायक पोलीस निरीक्षक अशोक धाबळे, पोलीस नायक प्रमोद सोनवणे, पोलीस नायक अनिल चक्रे, पोलीस शिपाई संतोष चुटे, पोलीस शिपाई मधू सोनी यांना निलंबित केले आहे.

No comments:

Post a Comment