नागापूर-निरगुडसर :- (प्रतिनिधी- प्रा. अरुण गोरडे.) दिः१५/०१/२०२२- क्षेत्र थापलिंग देवस्थान (पौष पौर्णिमा) मौजे नागापुर ता.आंबेगाव जि.पुणे.येथील यात्रा दिनांक 17 जानेवारी व दिनांक 18 जानेवारी होती .सदर श्री.खंडोबा देवस्थान हे आंबेगाव, जुन्नर,खेड व शिरूर तालुक्यातील ब-याच लोकांचे कुलदैवत असल्यामुळे सदर यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.परंतु सध्या आंबेगाव तालुक्यात कोरोना विषाणु तसेच ओमायक्रॉनचा प्रसार होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसुन येत आहे.बाधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता व सद्यस्थितीमध्ये रूग्णवाढीचा वाढता दर विचारात घेता कोरोना विषाणुचा व ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग रोखण्याकरिता शासनाने व जिल्हाधिकारी पुणे यांनी काही कडक निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता श्री.क्षेत्र थापलिंग देवस्थानचे यात्रेचे अनुषंगाने दिनांक -14/01/2022 रोजी थापलिंग देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष देवदत्त निकम व मंचर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतिश होडगर यांनी थापलिंग देवस्थान यात्रा कमेटीची मिटिंग घेण्यात आली असुन, सदर मिटिंग मध्ये श्री.क्षेत्र थापलिंग देवस्थान (पौष पौर्णिमा) मौजे नागापुर येथील यात्रा कोरोना व ओमिक्रॉन चा वाढता प्राधुर्भाव लक्षात घेता त्याचा यात्रेमुळे गर्दी होऊन भाविकांमध्ये त्याचा संसर्ग वाढु नये या करिता श्री.क्षेत्र थापलिंग देवस्थानची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे श्री.क्षेत्र थापलिंग देवस्थान ट्रस्ट यांचेकडुन सर्व भाविकांना सदरची यात्रा रद्द करण्यात आली आहे.मर्यादित लोकांमध्ये इतर विधिवत कार्यक्रम होतील व भाविकांना गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगने मंदिर दर्शनासाठी खुले राहिल.तसेच यात्रेची दिवशी कोणत्याही प्रकारे बैलगाडे पळविले जाणार नाहीत व कोणतेही खाद्य विक्री करणारे दुकानदार,पाळणे,इतर दुकाने लागणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी असे थापलिंग देवस्थान ट्रस्ट चे वतीने भाविकांना आवाहन करण्यात येत आहे.
Post Top Ad
Saturday, January 15, 2022
Home
ताज्या घडामोडी
नागापूर
कोरोनाचा संसर्ग वाढु नये या करिता श्री.क्षेत्र थापलिंग देवस्थानची यात्रा रद्द करण्याचा निर्णय..
कोरोनाचा संसर्ग वाढु नये या करिता श्री.क्षेत्र थापलिंग देवस्थानची यात्रा रद्द करण्याचा निर्णय..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment