झारगडवाडी ग्रामपंचायतीवर महिलाराज... सरपंचपदी वैशाली मासाळ तर उपासरपंच पदी सोनाली चव्हाण यांची बिनविरोध निवड... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 11, 2022

झारगडवाडी ग्रामपंचायतीवर महिलाराज... सरपंचपदी वैशाली मासाळ तर उपासरपंच पदी सोनाली चव्हाण यांची बिनविरोध निवड...

झारगडवाडी ग्रामपंचायतीवर महिलाराज... सरपंचपदी वैशाली मासाळ तर उपासरपंच पदी सोनाली चव्हाण यांची बिनविरोध निवड...

झारगडवाडी:- ग्रामपंचायत झारगडवाडीचे सरपंच नितीन शेडगे आणि उपसरपंच वैष्णव बळी यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन सरपंच निवडीचा निवडणूक कार्यक्रम प्रशासनाच्या वतीने लावण्यात आला होता.आज सकाळी दहा वाजता सरपंच पदासाठी भवानीमाता पॅनल कडून वैशाली संतोष मासाळ तर हनुमान पॅनल कडून प्रशांत कांतीलाल बोरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. प्रशांत बोरकर अर्ज मागे घेतल्यामुळे वैशाली संतोष मासाळ यांना बिनविरोध सरपंच घोषित करण्यात आले.तर सोनाली राहुल चव्हाण यांना उपासरपंच म्हणून घोषित करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न होऊ देता मोजक्या लोकांमध्ये भवानीमाता पॅनल च्या कार्यकर्त्यांनी या निवडीचा आनंदउत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी नूतन सरपंच उपसरपंच यांच्यासह नारायणराव कोळेकर, दयाराम महाडिक, राजेंद्र बोरकर, पोपटरावं निकम, हनुमंत झारगड, सुखदेव निकम, सतीश कुलाळ, आप्पासाहेब साळुंखे या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह मंडलधिकारी सय्यद, ग्रामसेवक काळे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment