धक्कादायक..एका महिलेने तिच्याशी सात जणांनी शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार,२५ हून अधिक लोकांना घेतले निरीक्षणाखाली...! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 11, 2022

धक्कादायक..एका महिलेने तिच्याशी सात जणांनी शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार,२५ हून अधिक लोकांना घेतले निरीक्षणाखाली...!

धक्कादायक..एका महिलेने तिच्याशी सात जणांनी शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार,२५ हून अधिक लोकांना घेतले निरीक्षणाखाली...!                                                                                                     केरळ:- हल्ली अनेक ठिकाणी विचित्र घटना घडत आहे अशीच एक घटना घडतेय,शारीरिक संबंध ठेवण्यासाठी लोक त्यांच्या पत्नी आणि इतर महिलांची देवाणघेवाण करत असत. अशा लोकांची संख्या दोन-चार नाही, तर हजारांहून अधिक आहे.पोलिसांनी या गटाचा खुलासा केला आहे. एका महिलेने तिच्याशी सात जणांनी शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार केल्यावर पोलिसांना या टोळीची माहिती मिळाली. केरळ पोलिसांनी या सात जणांना अटक केली, त्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे. केरळ पोलिसांनी कोट्टायम जिल्ह्यातील करुकाचल पोलिसांनी सांगितले की, सात जणांना अटक करण्यात आली आहे, २५ हून अधिक लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे आणि आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गटांमध्ये १ हजारहून अधिक जोडपी
आहेत आणि ते सेक्ससाठी महिलांची देवाणघेवाण करत होते. आरोपी राज्यातील तीन जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. राज्यभरातील लोक या रॅकेटचा भाग आहेत.कोट्टायममधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, "प्रथम टेलिग्राम आणि मेसेंजर ग्रुप्समध्ये सामील व्हावे लागत असे आणि नंतर दोन किंवा तीन जोडपी वेळोवेळी भेटत असत. त्यानंतर महिलांची देवाणघेवाण होत असे आणि तीन पुरुष एकावेळी एका महिलेला शेअर करत असल्याच्याही घटना आहेत. काही पुरुष पैशासाठी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी त्यांच्या
पत्नींचा वापर करतात. या महिला अदलाबदली
करणार्या गटातील लोकांचा सखोल तपास सुरू असून,या गटातील सदस्यांचे अन्य कोणत्या गटाशी संबंध आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment