बारामती शहरामध्ये मराठी साहित्य मंडळ तर्फे काव्य संमेलन सोहळा नुकताच संपन्न झाला तसेच बारामती शहर व तालुका व इदापुर तालुका कार्यकारीणीच्या रिक्त पदी नवीन सदस्यांना नियुक्तीपत्र वाटप... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 10, 2022

बारामती शहरामध्ये मराठी साहित्य मंडळ तर्फे काव्य संमेलन सोहळा नुकताच संपन्न झाला तसेच बारामती शहर व तालुका व इदापुर तालुका कार्यकारीणीच्या रिक्त पदी नवीन सदस्यांना नियुक्तीपत्र वाटप...

बारामती शहरामध्ये मराठी साहित्य मंडळ तर्फे काव्य संमेलन सोहळा नुकताच संपन्न झाला तसेच  बारामती शहर व तालुका व इदापुर तालुका कार्यकारीणीच्या रिक्त पदी नवीन सदस्यांना नियुक्तीपत्र वाटप...

 बारामती :-  शहरामध्ये  मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले . पुणे जिल्हा अध्यक्ष कवयित्री हर्षदा झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित साहित्यिकांचे रामभाऊ घोरपडे सर यांनी स्वागत केले. बारामती शहर अध्यक्ष सौ मंगला बोरावके यांनी त्यांच्या पैठणी, बावनकशी, नातीगोती, या पुस्तका विषयी बोलताना उखाणे सांगितले. तर कोंदन कवितासंग्रह पुरस्कार विजेत्या  विद्या जाधव यांनी "बाप" कविता सादर केली. मेराज बागवान यांनी वाचकांचे व लेखकांची मानसिकता या विषयावर आपले विचार व्यक्त केले. सौ साळुंके मॅडम यांनी "तू फिरून दान  द्याव"  ही निसर्ग आणि पाऊस यांचा मेळ घालणारी कविता सादर केली. तर सौ अलका रसाळ यांनी "सांगा ना तुम्ही, माझं काय चुकलं" ही  स्त्री अत्याचाराला वाचा फोडणारी कविता सादर केली.  इंदापूर हून आलेले औदुंबर भोसले यांनी कोरोना वर आधारित विडंबन गीत "येऊ कसा मी भेटायला" हे सादर केले तसेच जंक्शनचे कवी सुभाष लहू वाघमारे यांनी दलितांचे ज्वलंत प्रश्न मांडणारी कविता सादर केली. "आई" कविता सादर करताना ते म्हणतात 
"माझ्या आईच्या कपाळी लाल सूर्य उजळतो"
 त्याच लाल कुंकवातून घाम थेंब उजळतो"
शुभांगी जाधव यांनी "सासुरवासिन लेक "ही कविता तार सप्तकात गायली. 
 संजय भोंग यांनी  स्वातंत्र्याला   पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत,  त्यानिमित्त भारत देश कसा महान आहे . हे आपल्या काव्यातून सांगितले .कवयित्री पांढरे मॅडम यांनी "गर्भिन " कवितेतून "अंकुरला कोंब  बाई
 प्रीतिच्या या पोटी ग "
ही रचना सादर केली .अर्चना सातव यांनी त्यांचा वात्सल्य कथासंग्रह कसा सुचला हे सांगितलं .तर चित्रपट निर्माते संजय मोरे यांनी त्यांची कोंबडी ही कथा दिवाळी अंकात छापून आली त्याचं वाचन केलं. तर हर्षदा झगडे यांनी
कविता जन्मास कशी येते या विषयावरिल 'कविता म्हणजे काय'
ही रचना सादर केली. आजच्या काव्य मैफिलीतून शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची व शेतकरी कष्टकरी यांची महती सांगणारे काव्य रचना सादर केल्या . इतर नवोदित कवी मित्रांनीही आपला सहभाग नोंदवला .कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला 
प्रस्तापितां बरोबरच नवोदित कविनाही कविता सादर करण्याची संधी मिळावी हाच मराठी साहित्य मंडळाचा उद्देश आहे, असे पुणे जिल्हा अध्यक्षा कवयित्री हर्षदा झगडे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे
मराठी साहित्य मंडळ शाखा बारामती तर्फे आज दिनांक 9/1/2022 रोजी बारामती तालुका व शहर कार्यकारिणीच्या पदाधिकारी नवीन नियुक्त्या व काव्यसंमेलन घेण्यात आले.
*बारामती तालुका*
1) सौ दिपाली मिलन साळुंखे
बारामती तालुका उपाध्यक्ष
2)सौ अलका शरद रसाळ
बारामती तालुका उपाध्यक्ष 
3)सौ शुभांगी सोमनाथ जाधव
बारामती तालुका कार्यकारी सदस्य 
4) श्री संजय बाबुराव मोरे
बारामती तालुका कार्यकारी सदस्य
*बारामती शहर*
1) सौ विद्या रमेश जाधव 
बारामती शहरउपाध्यक्ष 
2) सौ विजया यशवंत चांदगुडे 
बारामती शहर उपाध्यक्ष 
3)सौ डॉ, हिमगौरी सतिश वडगांवकर 
बारामती शहर कार्यकारी सदस्य
4) सौ संगीता सुरेश पांढरे
बारामती शहर उपाध्यक्ष 
*इंदापुर तालुका*
1) श्री सुभाष लहु वाघमारे
इंदापुर तालुका उपाध्यक्ष 
2) श्री संजय मुकिंदा भोंग
इंदापुर तालुका उपाध्यक्ष
3)श्री औदुंबर लक्ष्मण भोसले
इंदापुर तालुका सरचिटणीस
         याप्रसंगी  काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वानी खुप सुंदर पद्धतीने  कवितांचे सादरीकरण केले.  तळागाळातील नवोदितांना व्यासपीठ मिळवुन देणे हाच मराठी साहित्य मंडळाचा हेतू असल्याचे  पुणे जिल्हाध्यक्ष सौ हर्षदा झगडे यांनी सांगितले. याप्रसंगी बारामती तालुकाध्यक्ष श्री युवराज खलाटे बारामती शहराध्यक्ष सौ मंगलताई बोरावके, तालुका उपाध्यक्ष सौ अर्चनाताई सातव, मेराज बागवान व सर्व नवनिर्वाचीत सदस्य उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment