उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने तब्बल वीस लाख रुपयांची बड्या बांधकाम व्यावसायीकाला खंडणी मागणारे अटकेत... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 13, 2022

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने तब्बल वीस लाख रुपयांची बड्या बांधकाम व्यावसायीकाला खंडणी मागणारे अटकेत...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने तब्बल वीस लाख रुपयांची बड्या बांधकाम व्यावसायीकाला  खंडणी मागणारे अटकेत...                                                                         पुणे:- नुकताच पुण्यातील बड्या बांधकाम
व्यवसायिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकी, 20 लाखाची मागितली खंडणी यामध्ये 6 जण अटक झाले,उघडकीस आलेल्या प्रकरणानुसार पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असून वाडेबोल्हाई येथील जागेचा वाद सोडविण्याबाबत धमकी देखील देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 1 नी सहा जणांना अटक केली आहे. नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय 28, रा हवेली), सौरभ नारायण काकडे (वय 20 रा हडपसर), सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (वय 28), किरण रामभाऊ काकडे (वय 25),चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय 19 रा भेकराई नगर,फुरसुंगी), आकाश शरद निकाळजे (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात IPC 384, 386, 506,34 आयटी अॅक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार याप्रकरणी बड्या बांधकाम
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील दहा दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत सुरू होता. बिल्डरने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, अटक आरोपी यांनी आपसात संगणमत करून गूगल प्ले स्टोअर  वरून फेक कॉल अॅप  नावाचे
अॅप डाऊनलोड केले. या अॅपद्वारे महाराष्ट्राचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल
क्रमांकाचा वापर करून त्यावरून बिल्डर यांना
फोन केला. त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार
यांचा पीए चौबे बोलतोय असे सांगण्यात आले.
बिल्डर यांना हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई
येथील शिरसाटवाडी येथील बाबा चोरामले व इतर नऊ जणांच्या मालकीची गट क्रमांक 85/1, 85/3 व 87 मधील एकूण सहा हेक्टर जमिनी संदर्भातील वाद मिटवून टाका असे सांगितले. तसेच बिल्डर यांना गावात भाऊ पाऊल ठेवू देणार नाही, तुमचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही अशी धमकी दिली.तसेच बिल्डर यांच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागून यातील दोन लाख रुपये आरोपींनी घेतले.  ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संके, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड ,सुनिल कुलकर्णी ,पोलीस अंमलदार अजय जाधव, अजय थोरात,अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर,महेश बामगुडे महिला पोलीस अंमलदार मिना पिंजण, रुखसाना नदाफ यांनी केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे करीत आहेत.

No comments:

Post a Comment