*नीरावासीयांना प्रजासत्ताकदिनानिमित्त पीएमपीएमएलची भेट- खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांतून २१ रोजी सुरू होतेय पीएमपीएमएल बस*
पुणे, दि. १३ (प्रतिनिधी) - पुरंदर तालुक्यातील निरा ते हडपसर दरम्यान पीएमपीएमएल बस येत्या २१ जानेवारी रोजी सुरू होत आहे. खासदार सुप्रिया सुळे याबाबत अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होत्या. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून निरावासीयांसाठी ही प्रजासत्ताक दिनानिमित्त भेटच मानण्यात येत आहे.
जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये कामासाठी जाणारे शेकडो कामगार तसेच दैनंदिन इतर कामासाठी नीरा ते जेजुरी आणि पुणे शहरापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा मात्र अत्यंत त्रोटक होती. त्यामुळे कित्येक प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन खासदार सुप्रिया सुळे या गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर बस सुरू करावी यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाकडे पाठपुरावा करत होत्या. त्याला अखेर यश आले असून बस सुरू करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या २१ जानेवारी रोजी नीरा ते हडपसर दरम्यान बस सेवा सुरू होणार आहे. यासाठी स्थानिक निरावासीयांनी खासदार सुळे यांचे आभार मानले असून ही येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भेट असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
No comments:
Post a Comment