*संघर्षाचा वसंत*पेपराच्या अर्थक्रांतीचे जनक - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 20, 2022

*संघर्षाचा वसंत*पेपराच्या अर्थक्रांतीचे जनक

*संघर्षाचा वसंत*
पेपराच्या अर्थक्रांतीचे जनक

बीड:- पेपरांनी क्रांती करायची मात्र चालवनाऱ्यानी  जगण्याची भ्रांती भोगायची , पेपरात बातमी यावी म्हणून पत्रकाराला कोरडे कोरडे साहेब म्हणायचे मात्र  चहाच्या अर्ध्या पैश्यात पेपर नाही घ्यायचा , दिवसात पन्नास चा चहा पिणारे पाच ला पेपर घेताना कंबर वाकडी करतात . म्हणूनच आमचेही ऐका म्हणत पत्रकारितेच्या हक्कासाठी हाका देणारा एक आवाज आजीवन संघर्षात सिद्ध होतोय , नेम ईज वंसत मुंडे . हो मुंडे म्हटले कि राजकीय नेतृत्वाची चर्चा होते मात्र पत्रकारांचा हा नेता चर्चेसाठी नाही तर पत्रकारांच्या भविष्य आयुष्यासाठी खर्ची पडताना दिसत आहे , केवळ वक्तृत्व नाही तर कृतत्वाचा बोलबोला केवळ लढ्याला आणि तर पत्रकारितेच्या परिघाला अर्थ प्राप्त करून देताना यशाच्या समीप आहे , देशाचा अर्थमंत्री बाटलीत व त्यांच्या गळी आमचा घाम उतरवण्याची किमया त्यांनी साधली आहे , अंबाजोगाई कडच्या कुठल्या खेड्यातला एक युवक बीड मध्ये येतो पेपर वाटत बातमीदार होतो आणि राज्याचे पत्रकारांचे अध्यक्ष होतात यासाठी केवळ प्रवास नाही त्यातले वळणे आणि थांबे महत्वाचे ठरतात .  मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मजल व वकूब मिळवत वसंत मुंडे यांनी अनेक प्रश्न सोडवून घेतले , विभागीय अधिस्वीकृती समितीवरून त्यांनी अनेक पत्रकारांचा प्रवास सुखकर केला आहे , आपल्या थपक्याचे कल्याण साधण्यासाठी राज्यभर धावणारे वसंत जी परवा मराठवाड्याच्या राजधानीत मैलाचा दगड ठरले आणि वृत्तपत्र व पत्रकारीतेच्या परिघात अर्थ प्राप्तीचे वळण साधले , देशाच्या अर्थ मंत्र्यांना म्हणजे भागवत कराड यांना एका ऐतिहासिक सुलह्यात राजी करणे सोपे नव्हते . पत्रकारितेच्या इतिहासात क्रांती करणारा आणि भविष्यकालीन निर्वाह ठरणारा पडाव त्यांनी टाकला आहे .
        महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी वृत्तपत्राला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी वृत्तपत्राची किंमत वाढ यासह अनेक महत्वाच्या भुमिका सातत्याने मांडल्या. तसेच वृत्तपत्र विकत घेणार्‍यांना आयकरातून सवलत मिळावी, ही मागणी लावून धरली या कर सवलतीमुळे सरकारचाही फायदा होणार आहे, हे शास्त्र शुध्द पद्धतीने समजावून सांगितले. ही सवलत दिल्यास रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. तसेच वृत्तपत्र व्यवसायामध्ये क्रांतीकारी बदल होणार असल्याचे केंद्र सरकारच्या लक्षात आनुन दिले, त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवत कराड यांनी या कार्यक्रमात महत्वपूर्ण घोषणा केली. वसंत मुंडे यांच्या मागणीला मिळालेले हे अभुतपूर्व यशच म्हणावे लागेल. कर सवलतीचा निर्णय जेव्हा प्रत्यक्षात अमलात येईल तेव्हा, वृत्तपत्र व्यवसायामध्ये अर्थिक क्रांतीचे नवे पर्व सुरू होईल आणि याचे श्रेय मराठवाड्याच्या या दोन भूमीपुत्रांना असेल.
 संघर्षाचा वसंत जेव्हा फुलतो तेव्हा त्याची फळे पुढच्या पिढीच्या गळी अलगद जातात , पत्रकारितेचे अस्तित्व आणि वास्तव यातला संदर्भ घेताना पत्रकारितेचे व पत्रकारांचे भवितव्य सुरक्षित करणारा अर्थ म्हणजे वसंत मुंडे सिद्ध झालेच आहेत याची साक्ष देण्याची गरज नाही , मात्र त्याचा दस्त बनावा म्हणूनचा हा शब्दबंध आहे . बीडचे संतोष मानूरकर आणि वंसत मुंडे या जोडीने स्व गोपीनाथ मुंडे , स्व विलासराव देशमुख ते शरद पवार देवेंद्र फडणवीस यांच्या सदरेवर आजतागायत चालत असलेली धरपड दिल्लीच्या सदरेपोत पोहोचली आहे . काम करवून घेण्याच कसब आणि कौशल्य सिद्ध होताना ऐतिहासिक निर्णय घेण्याचे भाग्य देखील कराडांच्या भाग्यी पेरणारे मुंडे म्हणजे पत्रकारांचे सुकानुधारी ठरतात .                             *क्रॉसलाईन*
दैनिक लोकाशा 9613331111

No comments:

Post a Comment