*जोशी समाजाच्या वतीने आत्मदहनाचा इशारा* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 3, 2022

*जोशी समाजाच्या वतीने आत्मदहनाचा इशारा*

*जोशी समाजाच्या वतीने आत्मदहनाचा इशारा*
                                                                     बारामती:- समस्त जोशी समाज जळोची यांचे वतीने, वन विभागाचे बारामती चे वनपरिक्षेत्र अधिकारी मा.शुभांगी लोणकर यांना निवेदन देऊन अत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला, गाव मौजे कन्हेरी गट नं 293 मधे, किशोर हंसराज पाचंगे यांचे आजोबा यांना तत्कालिन तहसीलदार रा तु गटकळ यांनी 1978 साली भूमिहीन लोकांना जमीन देऊ केली होती त्यामधे 2 हेक्टर जमीन पाचंगे यांना देखील दिली होती , तसा जमीन दिलेला आदेश देखील आहे, व आज रोजी सात बारा (7/12)दफ्तरी किशोर हंसराज पाचंगे यांची नोंद देखील आहे, असे असताना बारामती येथील वन विभागाच्या अधीकारी यांनी कोणतीही लेखी आथवा तोंडी नोटीस न देता, वनविभागाचा फौज फटा घेऊन दमदाटी करून, संपुर्ण जमीनी मधील उभा असलेल्या उसाचे पीक व ठिबक सिंचन नेस्तनाबूद करून टाकले, व सदर जमीनीचा ताबा घेतला,त्यासंदर्भात तत्कालिन वनपरिक्षेत्र अधिकारी काळे यांना भेटुन विचारणा केली असता त्यांनी फक्त वेळ काढु पणा केला,आणी जवळपास 6 महीने या गोर गरीब सामाजातील भटकंती करून जगणाऱ्या समाजाला झुलवत ठेवले, व बेकायदेशीर जमीनीचा ताबा घेतला आसुन ,आज रोजी त्यांना निवेदन देऊन आमची जमीन लवकरात लवकर परत करावी व केलेली नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा येणारया काळात आम्ही समाजातील लोक,आणी पाचंगे परिवार  बारामती वनविभागाच्या कार्यालय समोर अत्मदहन करू असा इशारा देण्यात आला आहे, या वेळी अँड.अमोल सातकर, किशोर पाचंगे, राहुल पाचंगे, बापु पाचंगे, संजय भांडे,वैभव वाईकर,सुभाष ढवळे, पुर्थीराज गदाई, सनी गदाई आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment