बांधकाम व्यावसायिकाकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागणारा पोलीस
अॅन्टी करप्शनच्या अटकेत.. कोल्हापूर(प्रतिनिधी) :- बांधकाम व्यावसायिकाकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणार्या लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई आज करण्यात आली आहे. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.दिग्विजय पांडुरंग मर्दाने रा.शिंगणापूर, ता. करवीर असे लाचेची मागणी करणार्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अनिल
धीरज साखळकर (रा. नागाळा पार्क) यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रार दिली आहे. मर्दाने यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,नागाळा पार्क येथील बांधकाम व्यावसायिक अनिल साखळकर यांच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास दिग्विजय मर्दाने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याचे आमिष दाखवून मर्दाने याने व्यावसायिकाकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 25 हजार रुपये मर्दाने याने घेतले होते.उर्वरित 25 हजार रुपयांसाठी मर्दाने यांनी बांधकाम व्यावसायिक साखरकर यांच्याकडे तगादा लावला होता. अखेर 25 हजार रुपयांपैकी 10 हजार रुपये देण्याचे ठरले.
साखळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत
यांची भेट घेऊन तक्रार दिली होती. 27 डिसेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली होती. त्यामध्ये यापूर्वी 25 हजार रुपये लाच स्विकारल्याचे आणि उर्वरित रक्कमेची मर्दाने याने मागणी केल्याचे स्पष्ट झाले त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल मर्दाने
याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.
No comments:
Post a Comment