बारामतीत मातंग समाजाच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 7, 2022

बारामतीत मातंग समाजाच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध..

बारामतीत मातंग समाजाच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध..

बारामती : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रबोधनकारांच्या यादीतून विश्वविख्यात थोर साहित्यिक,साहित्यरत्न,अण्णाभाऊ साठे यांचे नाव जाणीवपूर्वक वगळल्याने,संतप्त समाज बांधवांनी एकत्रित येत,केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. बारामती शहरातील हुतात्मा चौकात विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत केंद्राचा निषेध  निदर्शने केंद्र सरकारविरोधी घोषणा करत व भिगवन चौक या ठिकाणी ठिय्या आंदोलनतरच निषेध नोंदवला,


केंद्राच्या अखत्यारीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन द्वारे देशभरातील थोर समाज सुधारक व महामानवांची यादी तयार केली जाते. या यादीतील अण्णाभाऊंचे समाविष्ट असलेले नाव वगळण्यात आले. या अनपेक्षित कृत्यामुळे मातंग समाज व अण्णाभाऊ अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्याने सदर  घटने बद्दल निषेध आंदोलन करण्यात आले.


अण्णाभाऊ साठे जागतिक स्तरावरील थोर साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेल्या अनेक कथा,कादंबऱ्या भारत देशासह परदेशातील विविध भाषेत भाषांतरित झाले असून त्या लोकप्रिय ठरल्या आहेत. दीन -दलित,वंचित,उपेक्षित समाजाच्या व्यथा अण्णा भाऊंनी आपल्या कथा-कादंबऱ्यातून मांडल्या व समाजातील वंचित घटकांना प्रकाशात आणून वास्तव समाजासमोर मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास सातासमुद्रापलीकडे पोवाड्याच्या माध्यमातून पोहोचवला. अण्णाभाऊंचे विचार रशियासारख्या  बलाढ्य देशाने  स्वीकारले असल्याचे बिरजू मांढरे, सुनील शिंदे,राजू मांढरे, विजय खरात, अमृत नेटके, साधू बल्लाळ, चंद्रकांत खंडाळे, सोमनाथ पाटोळे,विजय नेटके,निलेश जाधव विशाल जाधव, यांनी आपल्या मनोगतातून सांगून सदर घटनेचा निषेध  व्यक्त केला. या निषेध आंदोलनात बारामती शहर व तालुक्यातील मातंग समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होता.

No comments:

Post a Comment