यवत पोलिसांची कमाल चार दिवसात बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम फोडणारी टोळी जेरबंद... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 20, 2022

यवत पोलिसांची कमाल चार दिवसात बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम फोडणारी टोळी जेरबंद...

यवत पोलिसांची कमाल चार दिवसात  बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम फोडणारी टोळी जेरबंद...  

 

दौंड:-   ता, २०/०१/२०२२, यवत येथील बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम ची चोरी  दि. १७/०१/२०२२ रोजी झालौ होतौ  त्या मधील रुपये २३ लाख ८० हजार ७०० रुपय चोरणारी अज्ञात इसमाच्या नावे यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता  सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मा. अभिनव देशमुख  तसेच अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग या. मिलिंद मोहिते  यांनी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक अशोक शेळके  तसेच यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक संदीप येळे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे रामेश्वर धोंगडे  यवत पोलीस सहाय्यक संजय नागरगोजे व इतर  चार पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी गोपनीय बातमीदार यांच्या मार्फत पथकांना बातमी मिळाली होती  सदरचा गुन्हा हा अजय रमेशराव शेंडे वय वर्ष ३२ रा  सहजपुर तालुका दौंड जिल्हा पुणे, याने त्यांचे  साथीदारांसह केलेला आहे.  दि. २०/०१/२०२२. रोजो संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आली आहे.  सदर आरोपी कडे वरील गुन्ह्याचा तपास करीत असताना सदरचा गुन्हा त्याचे साथीदार शिवाजी उत्तम गरड वय २५ वर्ष रा  करंजी पो लेहणी ता रिसोड जिल्हा वाशिम ऋषिकेश काकासाहेब कीरतिर्के वय २२ वर्ष या देवधानोरा या कळम जिल्हा उस्मानाबाद यांचे इतर दोन फरक साथीदारासह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी अजय शिंदे शिवाजी गरड. ऋषिकेश कीरतिके. यांना अटक करण्यात आली आहे  सदर गुन्ह्यात चोरी केलेल्या मला पैकी आरोपी अजय शेंडे याकडून रोख रक्कम रुपये 10.लाख. व गुन्हा करण्याकरिता वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी यांची सखोल चौकशी केली असता कुरकुम येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे दि. १६/०१/२०२२. रोजी. पहाटे एटीएम चोरी करण्याचा प्रयत्न केला दौंड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल रजिस्टर नंबर ३३/२०२२ भा.द.वि.क.३७९.५११. हा गुन्हा उघडकीस आला आहे

No comments:

Post a Comment