लोणी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर यांच्यावतीने तरकारी व भाजीपाला खरेदी विक्री बाजार सुरू - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 14, 2022

लोणी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर यांच्यावतीने तरकारी व भाजीपाला खरेदी विक्री बाजार सुरू

लोणी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर यांच्यावतीने तरकारी व भाजीपाला खरेदी विक्री बाजार सुरू


लोणी -(प्रतिनिधी कैलास गायकवाड):-   ता.१४-१-२०२2लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर, यांच्यावतीने उपबाजार लोणी याठिकाणी तरकारी व भाजीपाला खरेदी विक्री चा बाजाराचा.शुभारंभ झाला.या वेळी 60 मेट्रिक टन कॅम्पुटर वजन काटा व अंदाजे दोन कोटी रुपयांच्या शेडचे उदघाटन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू शेठ हिंगे यांच्या हस्ते झाले. तरकारी व भाजीपाला खरेदी-विक्री चा शुभारंभ   झाला . यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष  देवदत्त निकम, आंबेगाव तालुका समितीचे सभापती संजय गवारी, बाळासाहेब बाणखेले, गणपत इंदोरे, बाळासाहेब मेंगडे, माऊली घोडेकर, दत्ता हगवणे, जायदा बी मुजावर, पंचायत समिती सदस्य रवींद्र कारंजखेले, शेतमाल प्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष भगवान शेठ सिनलकर, लोणीच्या सरपंच उर्मिला ताईधुमाळ, उपसरपंच अनिल पंचारास, धामणी चे सरपंच सागर जाधव, खडकवाडी चे माजी सरपंच आणि रिसेट डोके, मागे सरपंच दिलीप शेठ वाळुंज, तसेच व्यापारी महेंद्र शेठ  वाळुंज, खरेदी-विक्री संघाचे भगवान शेठ वाघ, खरेदी-विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष नाथा घेवडे, प्रमोद शेठ वळसे, व्यापारी मच्छिंद्र शेठ वाळुंज, बाळासाहेब कोचर, व्यापारी आडतदार व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा, कोबी, फ्लावर, काकडी, बटाटा, व भाजीपाला मेथी, कांदा पात, व इतर भाज्या विक्रीसाठी आल्या होत्या.  कांद्याचा लिलाव 311 रुपयापर्यंत झाला. भाजीपाल्याला चांगला दर मिळाला. शेतकर्‍यांच्या वतीने महेंद्र शेठ वाळुंज यांनी  मनोगत व्यक्त केले.
 पंचायत समिती सदस्य रवींद्र कारंजखले यांनी व्यक्त भावना व्यक्त केल्या. सभापती देवदत्त निकम यांनी पेट्रोल पंप लवकरच सुरू केला जाईल अशी ग्वाही दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णू शेठ हिंगे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. आभार प्रमोद शेठ वळसे यांनी मानले.

No comments:

Post a Comment