बारामती-मोरगाव रोडवर भीषण अपघात,बारामतीतील तिघांचा मृत्यु.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 18, 2022

बारामती-मोरगाव रोडवर भीषण अपघात,बारामतीतील तिघांचा मृत्यु..

बारामती-मोरगाव रोडवर भीषण अपघात,बारामतीतील तिघांचा मृत्यु..                                                                                      बारामती:- बारामती - मोरगाव रोड हा अपघात घडण्याचे ठिकाण झाले की काय अशी चर्चा होऊ लागली आहे, दर दोन दिवसाला या रस्त्यावर अपघात होत असतात, आत्तापर्यंत शेकडो जणांचा या रस्त्यावर बळी गेला आहे,तर कित्येक जणांना अपंगत्व आले आहे,ह्या धोकेदायक रस्ता व रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू चा आकडा हा चिंताजनक आहे,पुन्हा एकदा नुकताच बारामती-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला कार आणि ट्रॅक्टर यांच्यात जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये दोन महिला आणि एका तरुणाचा समावेश आहे. बारामती तालुक्यातील मोरगावजवळ रात्री उशीरा हा अपघात झाला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोरगावनजिक भंडारी कुटुंबीय प्रवास करत असलेल्या कारची आणि एका ट्रॅक्टर-ट्रॉलीची धडक झाली. या भिषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सौ. अश्विनी श्रेणीक भंडारी, मिलिंद श्रेणीक भंडारी आणि सौ.कविता उदयकुमार शहा अशी अपघातातील मृत
व्यक्तींची नावे आहेत. ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने पाठीमागून येणार्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. भंडारी ज्वेलर्स श्रेनिक भंडारी यांच्या पत्नी अश्विनी भंडारी आणि मुलगा प्रथमेश भंडारी यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. बारामतीतील या तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तर अपघातात एक महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेने बारामतीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment