महिलेचे 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात दुचाकीस्वाराने हिसकाविले... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 19, 2022

महिलेचे 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात दुचाकीस्वाराने हिसकाविले...

महिलेचे 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात दुचाकीस्वाराने हिसकाविले...                                                                                                           निरगुडसर : (प्रतिनिधी : अरुण गोरडे):- दिः१९/०१/२०२२.श्री.क्षेत्र थापलिंग येथील यात्रेदरम्यान देव दर्शनाला जात असताना निरगुडसर येथे रिक्षा मध्ये बसलेल्या महिलेचे 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात दुचाकी स्वारांनी हिसकुन नेले, यासंदर्भात निशा गुलाब गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निशा गुलाब गायकवाड (रा.अवसरी बुद्रुक, ता.आंबेगाव जि. पुणे) व त्यांचे कुटुंब श्री क्षेत्र थापलिंग येथे देव दर्शन  जात असताना 17 जानेवारी दुपारी अडीचच्या सुमारास निरगुडसर गावच्या हद्दीत निरगुडसर फाटा ते निरगुडसर रस्त्यावर रिक्षाने जात असताना, के टी एम ड्यूक मोटरसायकलवरून पाठीमागून येऊन अनोळखी तीन इसमांनी निशा गायकवाड यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र हिसका मारून तोडून चोरून नेले आहे.यात गायकवाड यांची सुमारे दोन लाख रुपयांची चोरी झाली आहे.पुढील तपास मंचर पोलीस करत आहे. या आधी देखील या परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून जेष्ठ नागरिकांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत,त्याचा अद्याप तपास पोलिसांना लावता आला नाही.असे स्थानिक नागरीक बोलताना कळते.

No comments:

Post a Comment