चारित्र्यावर संशय घेत तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सांसरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल..
बारामती:- महिला सुरक्षित नसल्याचे अनेक उदाहरणे पुढे येत असताना सासरी देखील विवाहीत मुलगी सुरक्षित नसल्याचे दिसत आहे, बारामतीत अशीच एक घटना घडली, विवाहितेच्या कुटुंबाकडून पाच लाखांची
मागणी करणार्या आणि वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा शारिरीक
आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत व तिच्या
कुटुंबाकडून पैशाची मागणी करण्याचा
प्रकार ४ में २०२१ पासून ३ ऑक्टोबर
२०२१ या कालावधीत बारामती शहरातील कसब्यात घडला आहे.याबाबत पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पती
सचिन हरिश्चंद्र बनकर,सासरे हरिश्चंद्र बनकर,सासू छाया हरिश्चंद्र बनकर,दीर प्रशांत हरिश्चंद्र बनकर, जाऊ दिपाली प्रशांत बनकर ( सर्व.रा.आर्या
अपार्टमेंट,जामदार रोड,कसबा ता.बारामती,जि.पुणे) यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि 1.कलम ३२३,४९८,५०४, ५०६,३४ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपींनी
आपसात संगनमत करून विवाहितेच्या
चारित्र्यावर वारंवार संशय घेत,तिच्या कुटुंबाकडून पाच लाखांची मागणी केली.मात्र सासरच्या लोकांच्या मागण्या विवाहितेने पूर्ण न केल्याने त्यांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ
केला. तसेच विवाहितेच्या मालकीचे असलेल्या कुलस्वामिनी या जामदार रोडच्या मिनी मार्केट मध्ये गेले असता,दीर व जाऊ यांच्याकडून तुला जर लय हौस असल्यास तुझ्या आई-बापाकडून पाच लाख रुपये घेऊन ये.नाहीतर तू मिनी मार्केट मध्ये यायचे नाही,असे करत दुकानातून अपमानास्पद वागणूक देत हाकलून द्यायचे.पतीला सांगायला गेले तर तू त्यांनी सांगितल्या प्रमाणे पाच लाख आणून दे.मात्र माझ्यामुळे माझ्या आई वडिलांची मान शरमेने खाली जाऊ नये म्हणून हा सर्व त्रास मी सहन करत होते.कित्येकदा पती सचिन मला दारू
पिऊन शिवीगाळ करणे,घालून पाडून बोलणे,वेळेवर जेवण करू न देणे,रात्री अपरात्री घराबाहेर काढणे असा त्रास दिला जायचा व मारहाण करायचा असे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.याबाबत शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment