ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले,आणि बारामतीच्या मित्राकडूनच क्लिनिक समोर महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची तक्रारच दाखल झाली...! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 19, 2022

ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले,आणि बारामतीच्या मित्राकडूनच क्लिनिक समोर महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची तक्रारच दाखल झाली...!

ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले,आणि बारामतीच्या मित्राकडूनच क्लिनिक समोर महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची तक्रारच दाखल झाली...!                                                                            पुणे(प्रतिनिधी):- चक्क रुबी हॉल क्लिनिक च्या मेन गेट समोरून आत मध्ये जात असताना पीडित महिला डॉक्टरचा विनयभंग होतोय याबाबत महिला सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे,याबाबत जबाब देणारी पीडित महिला डॉक्टर वय 30 वर्षे पुणे समक्ष हजर राहून जबाब दिला की, मी वरिल पत्यावर पती *** यांचेसह रहाणेस असून रुबी हॉल क्लीनिक पुणे शहर येथे डॉक्टर म्हणून नोकरी करते व माझे पती केईएम हॉस्पिटल पुणे येथे डॉक्टर म्हणूंन नोकरी करतात. मी शासकीय वैद्यकिय विद्यालय, बारामती येथे ऑक्टोबर 2020 ते जुन 2021 या कालावधीमध्ये एका पदावर म्हणून नोकरी करीत होते. तेथेच शासकिय होस्टेलवर रहात होते त्या दरम्यान माझी नामे *** ***** बारामती ता, बारामती जि. पुणे.याचे बरोबर ओळख झाली व ओळखीचे रुपांतर मैत्रित झाले. त्याची व माझी मैत्री झाली होती आम्ही दोघे एकमेंकांना भेटत होतो. जुन 2021 मध्ये मी रुबी हॉल क्लीनिक पुणे येथे नोकरीला लागले. नंतर *** ***** हा अधून मधून मला भेटायला येत होता. परंतू मी त्यास भेटण्यास टाळाटाळ करीत होते. त्यास मी माझे लग्न झालेले आहे तु मला भेटायला येत जावू नकोस तुझे देखील लग्न झालेले आहे तु तुझा संसार पहा असे त्यास सांगितले होते.माझे आई व भाऊ असे दिनांक 21/12/2021 रोजी पुणे ग्रामिण महिला भरोसा सेल येथे गेलो होतो तेथे मुलगा *** हा हजर होता तेथील पोलीस अमलदार हे आमचेकडे चौकशी करुन विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देत असताना *** याने तुझ्या डयुटीमध्ये कोवीडचे पेशंट मेले आहेत त्याची चौकशी करुन तुला सोडणार नाही असे म्हणत होता. संबंधीत चौकशी महिला अधिकारी या आजारी असल्याने आमचे जबाब नोंदविले नाहीत त्यांनी आम्हाला दिनांक 21 रोजी येणेस सांगितले होते. त्यामुळे मी माझी आई व भाऊ रात्रौ 7/30 वा.चे चारचाकी मधून माझी विसरलेली पर्स घेणेसाठी रुबी हॉल येथे आलो असता रात्री 8/00 वा. सुमारास रुबी हॉल क्लीनिक, पुणे येथील पुढील गेट समोर उतरुन क्लीनिकमध्ये जात असताना त्यावेळी *** याने माझा पाठलाग करुन माझे पाठीमागून येवून माझा हात धरुन मी तुला सोडणार नाही असे म्हणत होता मी त्याचे तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करित असताना त्याने माझा विनयभंग करून व शिवीगाळ करुन, डीजी ऑफिस मुंबई येथे तक्रार करीन असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली त्यावेळी मी ओरडले असता माझी आई व भाऊ पळत आले त्यावेळी *** हा तेथून पळून गेला. घडला प्रकारामुळे मी खुप घाबरुन गेले होते त्यामुळे मी आई व भाऊ असे आईच्या घरी **** पुणे येथे गेलो व विचार विनिमय करुन आज रोजी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे तक्रार देणेस आली आहे. तरी माझे ओळखीचा मित्र नामे *** **** ***** रा.बारामती ता. बारामती जि. पुणे. याने भरोसा सेल पुणे ग्रामीण येथे केलेल्या तक्रारी अर्जाचे अनुषंगाने पीडित महिलेने *** याने माझे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे म्हणुन याचे विरूद्ध कायदेशिर फिर्याद दाखल आहे तर पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहे.

No comments:

Post a Comment