बारामती मध्ये रेझिंग डेच्या निमित्ताने पोलीस बँडचे प्रदर्शन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 6, 2022

बारामती मध्ये रेझिंग डेच्या निमित्ताने पोलीस बँडचे प्रदर्शन...

बारामती मध्ये रेझिंग डेच्या निमित्ताने पोलीस बँडचे प्रदर्शन...                                                                                                          बारामती:- पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने पुणे ग्रामिण बँड सर्वसामान्य जनतेची वर्दळ असलेल्या ठिकाणी बारामतीत इंदापूर चौक भिगवन चौक या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला. व त्याचे संचालन सुद्धा संपूर्ण रोडवर घेण्यात आली. अनेक शौर्य गीते आदेश देश प्रेमी गीते यावर वाजवण्यात आली  पोलीस बँड चे प्रदर्शन. बारामती शहरातील मुख्य बाजारपेठेत करण्यात आली. प्रामुख्याने पोलीस बँड चे सर्व सामान्य जनतेला आकर्षण असते. परंतु हा बँड समारंभ कवायत अति महत्त्वाच्या व्यक्ती यांच्या आगमना वेळीच वाजवला जातो. याबाबत सर्वसामान्य लोकांच्या मध्ये कुतूहल असते. परंतु आज सर्वसामान्य लोकांसाठीच पोलीस रेझिंग डेच्या निमित्ताने पोलीस बँडचे प्रदर्शन करण्यात आली. भिगवण चौक या ठिकाणी सुरेल संगीता चा बँड एक तास प्रदर्शन करण्यात आला. तसेच गांधी चौक सुभाष चौक तीन हत्ती चौक सिनेमा रोड या सर्व रोडवर या पोलीस पथकाने पायदळ कवायत करून बँडचे प्रदर्शन केले. या वेळी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व वाहतूक पोलिस उप निरीक्षक जाधव यांनी जनतेला अभिवादन केले हा बँड पाहण्यासाठी लोकांनी रस्त्याला उभे राहून पोलिस बँड चे कौतुक केले. अनेक तरुण या बँड चे आपल्या मोबाईल मध्ये क्षण टिपत होते. अशा उपक्रमामुळे पोलीस आणि जनता संबंध वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. कायम रस्त्यावर पोलीस कारवाई करतानाच दिसतात. परंतु आज पोलीस बँडचे प्रदर्शन करून लोकांचे मनोरंजन सुद्धा पोलिसांनी केले बारामतीकरानी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले

No comments:

Post a Comment