बारामती मध्ये विविध ब्रँड चा गुटखा जप्त... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 6, 2022

बारामती मध्ये विविध ब्रँड चा गुटखा जप्त...

बारामती मध्ये विविध ब्रँड चा गुटखा जप्त...

बारामती:- काल रात्री पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे यांना गोपनीय बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की पुनावाला गार्डन समोर महात्मा फुले लघु केंद्रांमधील गाळा नंबर 85 मध्ये विविध ब्रँडचा गुटखा ,सुगंधी तंबाखू, पानमसाला विक्रीसाठी ठेवलेला आहे व लोक त्या ठिकाणावरून किरकोळ विक्रीसाठी गुटखा घेऊन जात आहेत. अशी बातमी मिळताच दोन पंचांसमक्ष त्या ठिकाणी बारामती शहर पोलिसांनी छापा मारला .छाप्यामध्ये गुलाम ,विमल, चौकीदार ,आर एम डी, जाफरानी, विमल, गोवा 1000,पान पराग एक्स्ट्रा, पान मसाला विविध ब्रँडचे साठ रुपये पुडा ते 400 रुपये पुडा एमआरपी असलेले विविध ब्रँडचे एकूण 402 पुडे त्या ठिकाणी विक्री करताना मिळून आले याठिकाणी घेण्यासाठी आलेले दोन ग्राहक पळून गेले सदर जप्त केलेल्या गुटखा व तंबाखू व पान मसाल्याची एकूण बाजारातील एमआरपी किंमत 52 हजार रुपये आहे  या ठिकाणावरून पोलिसांनी हिरालाल हसन बागवान वय 52 वर्ष राहणार देसाई इस्टेट यांना त्या ठिकाणावरुन विक्री करत असताना मिळून आल्याने ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम 328, 272 तसेच अन्न सुरक्षा अधिनियम आचे विविध कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे. पोलीस हवालदार अभिजीत कांबळे. पोलीस नाईक दशरथ कोळेकर. पोलीस नाईक कल्याण खांडेकर. तुषार चव्हाण राऊत यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment