माळेगाव पोलिसांकडून हातभट्टीच्या तयार दारुचा मोठा साठा जप्त,मटका व गुटखावर कधी कारवाई?..
माळेगाव (प्रतिनिधी):- माळेगाव कार्यक्षेत्रात मोठी लोकसंख्या असून अनेक राजकीय घडामोडी या ठिकाणी घडतात,या भागात साखर कारखाना, कॉलेज मुळे नागरीक व तरुण युवकांची नेहमी वर्दळ असते अश्यातच चोरून दारू विकणारेमुळे अनेक जण व्यसनाधीन झाले आहे, तर गुन्हेगारी देखील वाढत आहे असे येथील नागरिक दबक्या आवाजात बोलताना दिसत आहे, देशी दारू, हातभट्टी, गांजा, व मटका, जुगार असे प्रकार चोरून चालले असल्याचे सांगण्यात आले असून याबाबत लवकरच वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना कळविणार असल्याचे समजते तर नुकताच एक कारवाई झाली त्यामध्ये स.पो. नि.श्री. घुगे, पोलिस नाईक राजेंद्र काळे, पोलीस नाईक दत्तात्रय चांदणे असे मौजे सांगवी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे गस्त करत असताना स पो नि श्री राहुल घुगे यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे ओमकार आडके राहणार तुकाईनगर सांगवी तालुका बारामती जिल्हा पुणे याने त्याचे राहत्या घरातील शेजारील शेडमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा विक्रीसाठी केला आहे.अशी बातमी मिळताच वर नमूद स्टाफ ने वर नमुद ठिकाणीं पंचांसमक्ष छापा टाकला असता तेथे एकूण 22,750 रुपये किमतीची 13 हत्ती कॅन मध्ये एकूण 455 लिटर हातभट्टी तयार दारू मिळून आली आहे.आरोपी ओमकार आडके यास ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने तो त्याचा साथीदार नामे सुनील सचिन खुडे राहणार सांगवी तालुका फलटण
जिल्हा सातारा त्याच्या मदतीने सदर चा व्यवसाय
करीत असल्याचे सांगितले आहे. आरोपीविरुद्ध
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.तर माळेगाव व माळेगाव खु. व आसपासच्या गावात व सांगवी भागात असे अवैध धंदे दिसून आल्यास पोलीस स्टेशनमध्ये माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment