रुई शासकीय हॉस्पिटलमध्ये झाडू मारणारा shadi.com वरुन लग्नाची मागणी घालून शारिरिक शोषण करणाऱ्याला बारामती पोलिसांनी केली अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 9, 2022

रुई शासकीय हॉस्पिटलमध्ये झाडू मारणारा shadi.com वरुन लग्नाची मागणी घालून शारिरिक शोषण करणाऱ्याला बारामती पोलिसांनी केली अटक..

रुई शासकीय हॉस्पिटलमध्ये झाडू  मारणारा shadi.com वरुन लग्नाची मागणी घालून शारिरिक शोषण करणाऱ्याला बारामती पोलिसांनी केली अटक..

बारामती(प्रतिनिधी):- रुई शासकीय हॉस्पिटलमध्ये झाडू मारणारा shadi.com सारख्या संकेतस्थळावरुन मुलींना लग्नाची मागणी घालून नंतर त्यांना आपल्या जाळ्यात ओढत आर्थिक आणि शारिरिक शोषण करणाऱ्याला बारामती पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने अनेक महिलांना आतापर्यंत गंडा घालत लाखो रुपये उकळले आहेत.अजयकुमार चौटाला (राहणार बारामती) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. याबाबत मुंबई येथील एका ३९ वर्षीय महिलेने शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून आरोपी अजयकुमार चटौला याने लग्नाचे आमिष दाखवत आपली पैशाची फसवणूक करून, २१ डिसेंबर २०२१ रोजी  बलात्कार व फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार बारामती तालुका पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याला पुणे जिल्ह्यातील भोर मधून अटक केली आहे. बारामती न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.यासंदर्भात बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले की, आरोपी अजयकुमार चटौला हा बारामती येथील रुई शासकीय रुग्णालयात झाडू मारण्याचं काम करतो. तो विवाहित असून देखील शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून मुलींना रिक्वेस्ट टाकून सरकारी नोकर असल्याचं सांगायचा. मुलींनी लग्नाची तयारी दाखवल्यावर त्यांच्याशी मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढून जवळीक साधायचा.  त्यानंतर मुलींच्या घरच्यांना भेटून विश्वास संपादन करायचा आणि मुलीला सोबत घेऊन फिरायला घेऊन जात होता. त्यानंतर मुलीशी शारीरिक सबंध प्रस्थापित करून  पैशांची गरज असल्याचे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करत असल्याचा प्रकार बारामती तालुका पोलिसांनी तपासात समोर आणला आहे.मुंबईच्या महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी चौटाला हा पुण्यातील दुसऱ्या मुलीसोबत नेहमीप्रमाणे खोटे बहाणे करून तिला पळवून आणून भोर येथील एका रूमवर रहात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे यांना मिळाली होती. त्यानुसार बारामती तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

No comments:

Post a Comment