खळबळजनक..अॅन्टी करप्शन विभागाच्या कारवाईत 11 लाखाच्या लाच प्रकरणी प्रांताधिकारी आणि सरपंचला अटक...
कोल्हापूर:- कोण किती पैसे घेईल याचा नेम नाही, नुकताच कोल्हापूर मध्ये नोटीसप्रमाणे कारवाई न करता नोटिसा परत घेण्यासाठी 11 लाखाच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 5 लाख 50 हजार रूपये घेतल्याप्रकरणी पुणे अॅन्टी करष्शन विभागाच्या कोल्हापूर युनिटने राधानगरी-कागल आणि फराळी गावाच्या
सरपंचास ताब्यात घेतले आहे.अॅन्टी करण्शनच्या या कारवाईमुळे संपुर्ण पश्चिम
महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.प्रसेनजीत बबनराव प्रांताधिकारी,राधानगरी-कागल उपविभाग, कोल्हापूर, सध्या रा. फ्लॅट नं. 303, सी विंग, विंसगेट अपार्टमेंट,न्यूज पॅलेस जवळ, कोल्हापूर. मुळ रा. घर नं.450, मित्रनगर, नवघन कॉलेज रोड, बीड शहर,जि. बीड) आणि संदीप जयवंत डवर फराळी ग्रामपंचायत, ता. राधानगरी. रा. मु.पो.लिंगाचीवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर)अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.तक्रारदार यांचे क्रशर असून सदर व्यवसाय बंद करण्याबाबत फराळी
व उपविभागीय अधिकारी राधानगरी-कागल
यांच्या कार्यालयाकडून नोटीसा देण्यात आल्या
होत्या. सदर नोटीसप्रमाणे कारवाई न करण्यासाठी आणि नोटिसा परत घेण्यासाठी फराळे गावचे सरपंच डवर यांनी स्वत:साठी 1 लाख रूपये आणि प्रांताधिकारी प्रसेनजीत
यांच्यासाठी 10 लाख रूपयांची मागणी केली
प्रांताधिकारी प्रधान यांनी सरपंच डवर यांच्या लाच मागणीस दुरजोरा देऊन सदरची लाच रक्कम डवर यांचेकडे देण्यास सांगितले
होते. दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली.त्याची एसीबीकडून दि. 8 आणि 9 जानेवारी 2022 रोजी पडताळणी करण्यात आली.त्यामध्ये प्रधान आणि डवर हे लाच मागत असल्याचे
निष्पन्न झाले.आज (रविवार) सरकारची पंचासमक्ष पहिला हप्ता म्हणून 5 लाख 50 हजार रूपये डवर याने घेतले. त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.त्यानंतर प्रांताधिकारी प्रधान यांना देखील एसीबीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर अधीक्षक सुरज गुरव अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर एसीबीचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत पोलिस निरीक्षक नितीन कुंभार अजय चव्हाण, शरद पोरे, मयूर देसाई, रूपेश माने, अमर भोसले, विकास माने आणि नवनाथ कदम यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे संपुर्ण पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment