गोष्ट एका लग्नाची मुलांनी केलं आई वडिलांचे लग्न... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 23, 2022

गोष्ट एका लग्नाची मुलांनी केलं आई वडिलांचे लग्न...

गोष्ट एका लग्नाची मुलांनी केलं आई वडिलांचे लग्न...

लोणी धामणी  -प्रतिनिधी -(कैलास गायकवाड)ता. २३/२/२०२२:- शिरोली ता.जुन्नर जि पुणे.येथील मूळ रहिवासी असलेले,सध्या शिक्रापूर तालुका शिरूर पुणे.येथे वास्तव्य असलेले, रामदास  मथाजी थोरवे व माणिक बाई रामदास थोरवे या सत्तरीतील उभयतांचा विवाह सोहळा ,त्यांच्या मुलांनी मुलींनी जावयांनी व आप्तस्वकीय मित्र मंडळी यांनी पुन्हा घडवून आणला . ७२च्या दुष्काळात रामदास आणि माणिक बाई यांचा दुष्काळी परिस्थितीत झालेल्या विवाहाची सल मनामध्ये होती. विवाह झाला. परंतु दुष्काळाच्या सावटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा झाला. रामदास थोरवे यांचा विवाह जवळच्या नात्यातील माणिक बाई यांच्याशी झाला.सुना सुषमा व शीतल मुले अविनाश, अतुल मुलगी वैशाली आदक व अर्चना येधे जावई  अशोक आदक पाटील,भास्कर येधे आणि मित्रपरिवार शेरखान शेख, संतोष केंजळे, अमोल दरेकर, दीपक ढोकले, सागर पंडित शरद जाधव डॉ. सुभाष लेव्हरकर इत्यादी मित्र परिवार हजर होता.मुलगा अतुल याने आईवडिलांच्या विवाहाची हौस पूर्ण करण्याची  कल्पना मांडली. साखरपुडा, हळद, परण्या मंगलाष्टक,बाशिंगआदी सोहळा अतिशय आनंदात पार पडला. आप्तस्वकीय,सोयरे,मित्रपरिवार हा सर्वासाठी आनंद सोहळा ठरला. सध्याच्या परिस्थितीत घरातील वृद्धांचे अवस्था पाहता थोरवे  परिवाराच्या मुलांनी आई-वडिलांना दिलेला हा सुखद धक्का होता. आपले लग्न अत्यंत साध्या पद्धतीने झालेले हे दुःख मनात ठेवून, रामदास थोरवे व माणिकबाई थोरवे यांनी अनेक गरीब मुला-मुलींचे विवाह लावून दिले. व गरीब गरजू मुला-मुलींचे विवाह कमी खर्चात करून दिले आहेत.
( याबाबत बोलताना रामदास थोरवे यांचे चिरंजीव अतुल थोरवे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत घरातील वृद्ध मातापित्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे, त्यांना आनंददायक वाटणारी अशी परिस्थिती घरात निर्माण केली पाहिजे या सर्व गोष्टींची जाणीव समाजाला व्हावी म्हणून हा सोहळा घडवून आणला.)

No comments:

Post a Comment