मराठी भाषा दिनानिमित्त मराठी शिकविणाऱ्या मुख्यध्यापकांचा मनसे तर्फे सत्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 28, 2022

मराठी भाषा दिनानिमित्त मराठी शिकविणाऱ्या मुख्यध्यापकांचा मनसे तर्फे सत्कार..

मराठी भाषा दिनानिमित्त मराठी शिकविणाऱ्या मुख्यध्यापकांचा मनसे तर्फे सत्कार..                                                       बारामती:-मराठी राज भाषा दिनानिमित्त  श्री.एस. पी साळवे सर डोर्लेवाडी हायस्कुल चे मुख्यध्यापक यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा अध्यक्ष अँड विनोद जावळे यांचे हस्ते पुष्प गुच्छ शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सर गेली 30 वर्षा पासून मराठी विषय विध्यार्थ्यांना शिकवत आहेत मराठी भाषा तरुण पीडीचे मना मनात रुजवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे येथून पुढे हि त्यांचे हातून मराठी भाषा विषय शिकवण्याचे पवित्र कार्य घडोत अशा त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी साळवे सरांनी मराठी भाषा विषया बाबत सखोल माहिती देत मार्ग दर्शन केले त्यांचे सोबत श्री सोनावणे सर याचा  हि सत्कार करण्यात आला अँड विनोद जावळे यांनी मराठी भाषे चे महत्व समजावून सांगत मनोगत व्यक्त  केले यावेळी  सपना ताई शिंदे महिला तालुका अध्यक्ष ,चंद्रकांत( दादा )भोसले शहर उप अध्यक्ष, संग्राम चांदगुडे तालुका उप अध्यक्ष ,निलेश कदम संघटक बारामती तालुका ,महेश सर ,श्रीकांत रोकडे ,शिंदे साहेब उपस्थित होते.

No comments:

Post a Comment