सोरट नावाचा जुगार चालवणाऱ्या महिलेला अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 28, 2022

सोरट नावाचा जुगार चालवणाऱ्या महिलेला अटक..

सोरट नावाचा जुगार चालवणाऱ्या महिलेला अटक

लोणी धामणी = प्रतिनिधी -(कैलास गायकवाड):- भोरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. येथे सोरट नावाचा जुगार चालविणाऱ्या महिलेवर वर पोलिसांनी कारवाई केली आहे.३९००रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तारीख २७/२/२०२२ भोरवाडी घाटाच्या  शेजारी एक महिला सोरट नावाचा जुगार  अवैधरित्या  चालवीत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत मिळाली. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी पोलिसांना पंच बरोबर घेऊन घटनास्थळी कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांना बैलगाडा घाटाच्या पूर्व बाजूला झाडाच्या आडोशाला एक महिला सोरट नावाचा जुगार चालवत असल्याचे आढळून आले. जुगार चालवण्यात या महिलेचे नाव ताई बबन पवार वय वर्षे एकवीस सध्या राहणार खराबवाडी अभिनव हॉस्पिटल जवळ तालुका खेड जिल्हा पुणे. पोलिसांनी तिच्या जवळून रोख रक्कम ३९००रूपायांचा मुद्देमाल आढळून आला. सदर महिलेवर मुंबई जुगार कायदा १२(अ ) गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार नाडेकर करत आहेत.

No comments:

Post a Comment