गुणवडी मध्ये गावठी हातभट्टी अड्डा उध्वस्त - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 28, 2022

गुणवडी मध्ये गावठी हातभट्टी अड्डा उध्वस्त

गुणवडी मध्ये गावठी हातभट्टी अड्डा उध्वस्त

बारामती:-उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी अवैध धंद्या बाबत कोणत्याही प्रकारे हायगय करू नका असे आदेश बारामती शहर पोलिसांना दिले आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणे गुणवडी 30 फाटा याठिकाणी उसाच्या शेतात केनल च्या कडेला इसम नामे लक्ष्मण साहेबराव बिरदवडे वय 40 वर्ष हा गावठी हातभट्टी दारू काढत असल्याची माहिती मिळाली त्या माहितीप्रमाणे रेड केला असता त्या ठिकाणी लोखंडी बारमध्ये 200 लिटर कच्चे रसायन व 35 लिटर गावठी हातभट्टी दारू त्या ठिकाणी मिळाली. सदर हातभट्टी वर तोडफोड करून व रसायन रासायनिक विश्लेषणासाठी जप्त करून कारवाई करण्यात आली. सदर लक्ष्मण बिरदवडे यांना तात्काळ त्या ठिकाणावरून अटक करून त्यांच्यावर भादवि कलम 328 व दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे कारवाई करण्यात आली. सदर इस मला अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर करून पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात आली आहे. यापुढे गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या लोकांच्यावर भादवि कलम 328 प्रमाणे की ज्याची केस ही सत्र न्यायालयात चालेल व दहा वर्ष शिक्षा आहे असे कलम लावून कारवाई करण्यात येणार आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय जगदाळे दशरथ इंगोले कल्याण खांडेकर दशरथ कोळेकर अभी कांबळे तुषार चव्हाण राऊत यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment