पाचवड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कांता अरुण साकोरे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 28, 2022

पाचवड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कांता अरुण साकोरे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार...

पाचवड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका 
कांता अरुण साकोरे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार...

लोणी धामणी :-प्रतिनिधी -(कैलास गायकवाड) ता.२८/२/२०२२ प्राथमिक शाळा पाचवड, केंदूर ता. शिरूर जि. पुणे.येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका  कांता अरुण साकोरे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार  राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे,  जिप उपाध्यक्ष रणजित शिवतारे, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड,  जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे, इत्यादी नेते हजर होते. पंचायत समितीच्या उपसभापती सविताताई पऱ्हाड, गट शिक्षण अधिकारी अनिल बाबर, विस्तार अधिकारी  काळे, केंद्रप्रमुख  सोनवणे, यांनी सर्वांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लिंमगुडे, उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, सर्व सदस्य, केंदुर गावचे सरपंच व उपसरपंच, ग्रामस्थ व पालक यांनी आनंद व्यक्त केला.
 लोणी येथील भैरवनाथ विद्याधाम प्रशाला चे प्राचार्य अरुण साकोरे सर यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी अध्यक्ष उदयराजे वाळुंज, गृह खात्याचे सचिव कैलास गायकवाड ग्रामस्थांनी साकोरे मॅडम यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment