अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्कात असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन.... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 23, 2022

अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्कात असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन....

अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्कात असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन....
 पुणे:-अवैध धंदेवाल्याशी संपर्क करणे पडते महागात याबाबत सविस्तर असे, शहरातील अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या संपर्कात राहून कर्तव्यात सचोटी,कर्तव्यपरायणता न राखल्यामुळे एका वजनदार पोलिस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबीत करण्यात आलं आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या राजु धोंडीबा वेगरे यांना पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी निलंबीत केले आहे. त्याबाबतचे आदेश त्यांनी बुधवारी रात्री उशिरा निर्गमित केले आहेत.अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही. कोठेही अवैध धंद्ये सुरू राहणार नाहीत याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी यापुर्वीच स्पष्ट केलं आहे. तरी
काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम अवैध
धंद्ये सुरू आहेत असं निदर्शनास आल्यानंतर
प्रभारी अधिकार्यावर कारवई केली जात आहे. मात्र,वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना महिन्याकाठी मलिदा गोळा करणारे तसेच पोलिस ठाण्याचं महत्वाचं कामकाज बघणारे नामानिराळे रहात होते.विद्यापीठ पोलिस ठाण्यात वजनदार पोलिस
कर्मचारी 'राज वगैरे-वगैरे' असा उल्लेख एका
बातमीमध्ये केला होता. त्यानंतर अति वरिष्ठ
पोलिस अधिकार्यांनी गोपीनियरित्या माहिती
घेतली.  त्यामध्ये भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी राजु धोंडीबा वेगरे हे शहरातील अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या संपर्कात असल्याचं निष्पन्न झालं.
अति वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी संबंधिताची
चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले
होते.त्यानंतर पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी
राजु वेगरे यांना तडकाफडकी निलंबीत केले
आहे.

No comments:

Post a Comment