सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी येणार जाग?वडगाव ते सोमेश्वर पर्यंत रस्त्यावर का होतात अपघात..नागरिकांचा संतप्त सवाल.! बारामती:- अजून किती अपघात होणार आहे या रस्त्यावर..कधी यावर काही नियोजन होईल का असा सवाल वडगाव ते सोमेश्वर रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांनी विचारला आहे..अनेकांचे बळी गेले तरी अजून सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग का येत नाही?नुकताच बारामती नीरा रस्त्यावर सोरटेवाडी येथून कारखान्याच्या दिशेने चाललेल्या ऊस बैलगाडीवर फोर व्हीलर गाड़ी धडकली आणि क्षणभर काळजाचा ठोका चुकला,नशीब बलवत्तर म्हणून गाडीच्या इयर बॅग ओपन झाल्याने दोघांचा जीव वाचला मात्र चारचाकीचे नुकसान झाले आहे तर कार च्या धडकेने ऊसाची बैलगाडी पलटी होऊन बैल जखमी झाले आहेत.ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि बैलगाड्या अजून किती जीव घेणार हे मागील अनेक घटनांवरून दिसून येत आहे, सोमेश्वर,सोरटेवाडी ते दहा फाटा येथपर्यंत रस्त्यावर अनेक अपघात झाले आहे तर अनेकांचा जीवही गेला आहे,या रस्त्याच्या कामात काही हलगर्जीपणा झाला की संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले म्हणून या रस्त्याच्या कडेने अनेक ठिकाणी साइट पट्ट्या व्यवस्थित नाही अपघात क्षेत्र ,वाहन नियंत्रण ,शाळा पुढे असल्याचे ,वळण असल्याचे बोर्ड पहावयास मिळत नाही, ठेकेदार मात्र रस्त्याच्या कामात काही गडबड करतोय का हे सुद्धा पाहिले जाते की नाही ही एक शंका आहे, तर रस्त्याच्या कडेने केबल खोदाई मुळे देखील अपघात झाले होते याबाबत वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रारी व कल्पना देऊनही लक्ष घातले गेले नाही तर शाखा अभियंता मात्र एकमेकांवर टोलवाटोलवी करीत होते.पण नशीब मुख्यमंत्री महोदय या रस्त्याने जाणार म्हणून घाईगडबडीत का होईना रस्ता बनविला पण वडगाव ते सोमेश्वर या रस्त्याच्या कडेला काही झाडे धोकेदायक आहेत ज्यावर गाड्या धडकून अपघात होतात तर काही ठिकाणी पांढऱ्या पट्ट्या न मारल्याने व स्पीड ब्रेकर न बसविल्याने देखील अपघात होत आहे तर काही ठिकाणी साईट पट्ट्या भरल्या नाहीत याकडे अधिकारी कधी लक्ष देतील की अजून बळी जाण्याची वाट पाहत आहे असे येथील स्थानिक रहिवासी यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र देऊन अश्या दुर्लक्ष करणाऱ्या शाखा अभियंता वर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे कळतंय.
Post Top Ad
Sunday, February 13, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी येणार जाग?वडगाव ते सोमेश्वर पर्यंत रस्त्यावर का होतात अपघात..नागरिकांचा संतप्त सवाल.!
सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी येणार जाग?वडगाव ते सोमेश्वर पर्यंत रस्त्यावर का होतात अपघात..नागरिकांचा संतप्त सवाल.!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment