यशवंत ब्रिगेड, टीमचे मिशन ओबीसी जनजागृती अभियान :- प्रदेशाध्यक्ष बापुराव सोलनकर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 6, 2022

यशवंत ब्रिगेड, टीमचे मिशन ओबीसी जनजागृती अभियान :- प्रदेशाध्यक्ष बापुराव सोलनकर

यशवंत ब्रिगेड, टीमचे मिशन ओबीसी जनजागृती अभियान   :- प्रदेशाध्यक्ष बापुराव सोलनकर

 १५ एप्रिल पासून करणार अभियानाला सुरुवात

बारामती:- यशवंत ब्रिगेड संघटनेची टीम  एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रातील १०० विधानसभा मतदार संघामध्ये ओबीसी समाजातील प्रत्येक घटकांमधील लोकांशी संवाद साधणार आहे, यामध्ये" OBC १००+ विधानसभा आमदार २०२४ " हे मिशन राबवणार असल्याचे यशवंत ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष बापुराव सोलनकर यांनी पत्रकारांशी बोलताना  हे मिशन २०२४ च्या विधानसभा निवडणुकी पर्यंत चालणार असल्याचे सांगितले .

महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाची लोकसंख्या प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये ६० ते ७० टक्क्यांपर्यंत आहे, परंतु ओबीसी समाजाची सर्वच पक्षांकडून  चेष्टा  करण्यात आली आहे, ओबीसींना राजकारणातून हद्दपार करण्याचे मोठे षडयंत्र केले जात आहे, हे ओबीसींना कधी कळणार, ओबीसींनी आता जागरूक राहिले पाहिजे, प्रस्थापितांनी ओबीसींची मते घेऊन ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवले, प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये "ओबीसी उमेदवाराला ओबीसींनी मतदान केले तर महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे किमान १०० च्या वर आमदार येतील", व ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होईल, सत्ता आपल्या हातात पाहिजे यावर आता समाजाने विचार करणे गरजेचे आहे, ओबीसी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न यशवंत ब्रिगेड टीम करणार आहे, ओबीसी समाजातील संघटनांनी या अभियानात सहभागी व्हावे, ओबीसींच्या मतांमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय ओबीसींना न्याय मिळणार नाही असे सोलनकर यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment