आत्ता जास्त दिवस वाट बघण्याची गरज नाही, पुणे जिल्ह्यात जमीन मोजणी होणार अवघ्या 30 मिनिटांत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, April 25, 2022

आत्ता जास्त दिवस वाट बघण्याची गरज नाही, पुणे जिल्ह्यात जमीन मोजणी होणार अवघ्या 30 मिनिटांत..

आत्ता जास्त दिवस वाट बघण्याची गरज नाही, पुणे जिल्ह्यात जमीन मोजणी होणार अवघ्या 30 मिनिटांत..                                   पुणे :जमीन मोजणी साठी वाट पाहावी लागत होती तर काही वेळा ज्यादा पैसे देऊन तातडीची मोजणी करावी लागत होती पण आत्ता पुणे जिल्ह्यातील  कोणत्याही जमिनीची मोजणी 30 मिनिटांत करणे शक्य होणार आहे. त्यासाठी 11 रोव्हर मशिन  भूमि अभिलेख विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या मशिनच्या सहायाने अचूक आणि अगदी कमी वेळेत मोजणी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे जमिनीची मोजणी करण्यासाठी पैसे भरून वाट पाहणे आता कमी होणार आहे.भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने राज्यामध्ये 77 ठिकाणी कॉर्स उभारले आहे. या कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग केवळ तीस सेकंदात घेता येते.कॉर्सचे रीडिंग रोव्हर रिसिव्ह करणार असून हे रीडिंग टॅबमध्ये दिसणार आहे. हे रोव्हर खरेदी करण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीकडून 2 कोटी 99 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. यामधून 35 रोव्हर खरेदी केले गेले. पहिल्या टप्प्यामध्ये अकरा रोव्हर प्राप्त झालेत. एका रोव्हरमुळे रोज 4 ते 5 ठिकाणच्या मोजणी पूर्ण होणार आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये जमिनीची मोजणी गती वाढणार असून मोजणीची प्रक्रिया
अतिशय कमी वेळेमध्ये तसेच अचूक होणार
असल्याचं दिसते. भूमी अभिलेख विभाग पुणे प्रदेशचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी
सांगितलं की, "पुणे जिल्ह्याला 11 रोव्हर
मशिन प्राप्त झाल्या आहेत.त्यासाठी शंभर कर्मचाऱ्यांना या रोव्हरच्या माध्यमातून मोजणी कशी करावी, याचे प्रशिक्षण देण्यात आलेय.बाकी 24 मशिन लवकरच येतील. त्यामुळे मोजणीचे काम गतिमान आणि अधिक अचूक होण्यास मदत होणार आहे.तसेच एका मोजणी केल्यानंतर भविष्यात पुन्हा त्या जमिनीची मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर मोजणीची गरज पडणार आहे.पैसे भरल्यानंतर कोर्डीनेटवरून मोजणीची प्रत लगेच उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचं," सांगण्यात आलं आहे,यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment