लोणी ते राजगुरूनगर मार्गे पुणे पी.एम.पी.एम.एल बस ची सेवेची मागणी ..
लोणी धामणी (प्रतिनिधी - कैलास गायकवाड):- ता.१३/४/२०२२ लोणी तालुका आंबेगाव येथून लोणी ते पुणे राजगुरुनगर मार्गे परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू करण्याची मागणी लोणीच्या सरपंच उर्मिला ताई धुमाळ व चंद्रकांत गायकवाड लोणी व व्यापारी बाळासाहेब कोचर, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग दिवटे यांनी केली आहे. अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना दिले आहे.लोणी, वाफगाव गुळानी, जरेवाडी, भांबर वाडी, धामणी, शिरदाळे या परिसरातील ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना, आजारी व्यक्तींना, कामगारांना राजगुरुनगर,चाकण, पिंपरी- चिंचवड येथे रोज जावयास लागते. शालेय विद्यार्थ्यांना राजगुरुनगर येथे कॉलेज व शाळे साठी जाण्यासाठी कोणतीही सोय नाही.सातत्याने पाठपुरावा करून लोणी ते पुणे बस सेवा शिक्रापूर मार्गे सुरू केली आहे. या बस सेवेमुळे लोणी,धामणी वडगावपीर,मांदळेवाडी, रानमळा , वाळुंज नगर, खडकवाडी, सविंदणे, शिरदाळे पहाडदरा, पारगाव इत्यादी गावातील विद्यार्थी,कामगार व प्रवासी यांची मोठी सोय होईल लोणी हा परिसर बाजारपेठेचा असून, व्यापाऱ्यांची व शेतकरी, विद्यार्थी आजारी व्यक्तींना पुण्यात जाण्याकरिता चांगली सोय होईल, तसेच चालू असणाऱ्या बस सेवेमध्ये त्यांना मासिक पास, दैनिक पास सुरू करावा अशी मागणी रानमळा चे सरपंच राजेश सिनलकर, वाळुंज नगर चे सरपंच विजय सिनलकर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष शरद वाळुंज, उपसरपंच अनिल पंचारास, राजेश सोनवणे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment