आत्ता या तालुक्यात देखील होतोय रेशनिंगचा काळाबाजार..तीन टन गव्हू पकडला..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 12, 2022

आत्ता या तालुक्यात देखील होतोय रेशनिंगचा काळाबाजार..तीन टन गव्हू पकडला..!

आत्ता या तालुक्यात देखील होतोय रेशनिंगचा काळाबाजार..तीन टन गव्हू पकडला..!                                                      इंदापूर/बारामती:- रेशनिंगचा काळाबाजार ही नित्याचीच बाब होऊन बसली आहे, मग ती अधिकारी वर्गाला हाताशी धरून असो अथवा पुढाऱ्याला हाताशी धरून असो, अनेक वेळा अश्या काळाबाजारात विकला जाणाऱ्या रेशनिंगचा माल जप्त करून कारवाई झाली पण त्याचे पुढे काय झालं ? याचं उत्तर अजून नाही, तर अनेक वेळा मार्केट व बाजारात रेशनिंगचा गहू तांदूळ विकताना पकडला पण त्याला क्लिन चिट देण्याचं काम जास्त झालं कारण अश्या व्यापारी वर्गाचं दुकानदार व अधिकारी वर्गाचं साटेलोटे असल्याने अश्या कारवाई मनापासून होत नाही नव्हे ती केली जात नाही, कुठेतरी नकळत एखादी एखादी कारवाई होते बारामती व इंदापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी रेशनिंगचा काळा बाजार चालतो हे माहीत असताना देखील पुरावे द्या अशी मागणी होते जर पलटी केलेला माल खरंच तपासून पहिला तर तो रेशनिंगचा माल असल्याचे खात्री होईल पण ती वेळ  येऊ देत नाही, तक्रार करणाऱ्यालाच उलट खोटं ठरविले जाते, नुकताच इंदापूर तालुक्यातील रेशन दुकानातील तब्बल तीन टन गव्हाची बेकायदेशीर व अवैध साठवणूक करून अपहार करत असताना इंदापूर पोलिसांनी महसूल खात्याने व अन्न पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत या दुकानदारावर कारवाई केली.कारवाईचे स्वागतच आहे; इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूरचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी महसूल व पोलिस प्रशासनाच्या केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 65 पिशव्या आणि तीन टन शंभर किलो पोलिसांनी या कारवाईत गहू पकडला. पुरवठा निरीक्षक संतोष निशीकांत अनगरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मयुर अशोक चिखले (वय ३२ वर्ष), अतुल सोमनाथ होनराव (वय ४९ वर्ष) व वत्सला भानुदास शिंदे या तिघा विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.या गव्हाची शासनमान्य किंमत 62 हजार रुपये असून या गव्हासह महिंद्रा कंपनी चा ४ लाख रूपये किंमतीचा पिकअप (क्रमांक : एम. एच. ४२ एम
७०३३) पोलिसांनी ताब्यात घेतला. यासंदर्भात
पुरवठा निरीक्षक संतोष अनगरे यांनी इंदापूर
पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

No comments:

Post a Comment