भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत उपक्रम**समाज कल्याण कार्यालयाकडून ‘स्टँड अप इंडिया मार्जिन मनी कार्यशाळेचे’ यशस्वी आयोजन* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 12, 2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत उपक्रम**समाज कल्याण कार्यालयाकडून ‘स्टँड अप इंडिया मार्जिन मनी कार्यशाळेचे’ यशस्वी आयोजन*

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत उपक्रम*

*समाज कल्याण कार्यालयाकडून ‘स्टँड अप इंडिया मार्जिन मनी कार्यशाळेचे’ यशस्वी आयोजन*

पुणे, दि. 12: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत सहायक आयुक्त समाजकल्याण पुणे कार्यालयामार्फत ‘स्टँड अप इंडिया मार्जिन मनी कार्यशाळेचे’ आज आयोजन करण्यात आले. यावेळी मार्जिन मनी योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.

विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात समाजकल्याण आयुक्तालयातील सहआयुक्त प्रशांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहायक आयुक्त संगिता डावखर, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रमुख व्यवस्थापक व जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक के.बी. हवालदार आदी उपस्थित होते.

राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात 16 एप्रिल 2022 पर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कालावधीमध्ये सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

यावेळी सहआयुक्त श्री. चव्हाण यांनी स्टँड अप इंडिया योजनेबाबत मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. श्रीमती डावखर यांनी यशस्वी उद्योजक घडण्यासाठी उपयुक्त बाबींची माहिती दिली. श्रीकांत कारेगावकर यांनी युवा उद्योजकांना उद्योगासाठी मिळणारे कर्ज, अटी व शर्ती तसेच कर्ज मिळवण्याची कार्यपद्धती आदीबाबत मार्गदर्शन केले. श्री. हवालदार यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. कर्वे समाजसेवा संस्थेचे सहयोगी प्राध्यापक महेश ठाकूर यांनी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता कमी भांडवलामध्ये करता येणाऱ्या छोट्या व्यवसायांकडे वळावे असे सांगून अशा व्यवसायांबाबत मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमास समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाचे सहायक संचालक मारूती मुळे, जिल्हा समाजकल्याण कार्यालयालयाचे विशेष अधिकारी एम. आर. हरसुरे, समाजकल्याण निरिक्षक वैभव लव्हे, फॅबफोकस सोल्युशनचे राजकमल सांगोले, रवी जोसेफ आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment