भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मूकबधिर तरुण-तरुणीचा शुभ विवाह* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 17, 2022

भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मूकबधिर तरुण-तरुणीचा शुभ विवाह*

*भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मूकबधिर तरुण-तरुणीचा शुभ विवाह*


पारगाव प्रतिनिधी (पियुष गायकवाड):-ता.17/04/2022 पाबळ तालुका शिरूर  येथील मारुती पंढरीनाथ गायकवाड यांचे चिरंजीव प्रशांत व भटक्या-विमुक्त शिक्षण संस्था येथे कार्यरत असलेले पांडुरंग पाटील यांची कन्या सारिका हे दोघेही मूकबधिर असून, वधू सारिका चे शिक्षण भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्था वाघोली या संस्थेच्या मूकबधिर शाळेत झाले आहे. तर वर प्रशांत यांचे शिक्षण भोसरी येथे झाले आहे. दोघे वधू-वर मूकबधिर असल्यामुळे विवाह जमण्यात अडचणी येत होत्या. भटक्या-विमुक्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सारिका साठी योग्य वर संशोधन करत होते. मतिमंद शाळा पाबळ चे व्यवस्थापक  गजानन जाधव, शिक्षक सत्यवान जाधव यांनी प्रशांत यांचे नाव सुचवले. चर्चेअंती मुला-मुलीच्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन लग्न करावयाचे ठरले लग्नाचा पूर्ण खर्च मुलाच्या कुटुंबीयांनी केला. भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवलाल जाधव यांनीही लग्नकार्यासाठी हातभार लावला.
 ते नेहमीच गरीब व अनाथ मुले यांच्यासाठी लग्ना करिता पुढाकार घेत असतात. आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच मुला-मुलींची लग्न लावून दिले आहेत. मुलाचे वडील हे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असून, पाबळ येथे शेती करतात. लग्न सोहळ्यास शिवाजीराव गायकवाड, समाज भूषण कैलासराव गायकवाड, शिक्षण संस्थेचे सचिव रतनलाल जाधव तसेच पाबळ गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment