लूटमार करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला बारामती शहर पोलिसांनी केली अटक..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 23, 2022

लूटमार करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला बारामती शहर पोलिसांनी केली अटक..!

लूटमार करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला बारामती शहर पोलिसांनी केली अटक..!                                                                  बारामती:- मळद गावात लूटमार करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करण्यात आली याबाबत माहिती अशी की,
काल दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी प्रदीप बाळू गायकवाड वय 26 वर्ष राहणार भैय्या वस्ती मळद हे दिवसभर एमआयडीसीत काम करून मोटरसायकलवर आपल्या घरी जात असताना. मळद चे सुरज रवींद्र मदने व बबन आईवळे यांनी त्याला मोटरसायकल आडवी लावून बळजबरीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने ते देण्यास नकार दिला असता त्या दोघांनी त्याला फायटर ने मारहाण केली. त्यानंतर त्याला परत मळद ग्रामपंचायतीसमोर अडवले त्यावेळी त्या ठिकाणी मळद गावातील गुंड भोऱ्या बापूराव जाधव व अमोल रवींद्र मदने हे सुद्धा त्या दोघांना येऊन मिळाले व त्या सर्वांनी त्याला परत मारहाण करून त्याच्या खिशातील बाराशे रुपये काढून घेतले. व त्याला दमदाटी केली. या टोळी बद्दल यापूर्वीसुद्धा खूप लहान मोठ्या तक्रारी पोलिस ठाण्यात नाव न सांगण्याचे अटीवर पोलिसात येत असतात त्यामुळे त्यांचेवर तात्काळ गुन्हा दाखल करून रेकॉर्डवरील गुन्हेगार भोऱ्या जाधव याला तात्काळ अटक केली बाकीचे आरोपी त्याला अटक होताच परागंदा झाली . त्यांना माननीय न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे. त्यांच्यावर नजीकच्या काळात प्रतिबंधक कारवाई होणार आहे. त्यांच्याविरुद्ध छोट्या-मोठ्या तक्रारी असतील त्या निर्भीडपणे लोकांनी पोलीस स्टेशनला द्याव्यात. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील. पोलीस कर्मचारी दळवी. सहाय्यक पोलीस फौजदार जगदाळे. कोळेकर यांनी केलेली आहे

No comments:

Post a Comment