धामणी नळ पाणी पुरवठा योजना लवकरच सुरु करण्यास कटिबद्ध - विवेक वळसे पाटील* *कार्यकारी अभियंता यांचेकडून पाहणी दौरा* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 14, 2022

धामणी नळ पाणी पुरवठा योजना लवकरच सुरु करण्यास कटिबद्ध - विवेक वळसे पाटील* *कार्यकारी अभियंता यांचेकडून पाहणी दौरा*

*धामणी नळ पाणी पुरवठा योजना लवकरच सुरु करण्यास कटिबद्ध - विवेक वळसे पाटील*
*कार्यकारी अभियंता यांचेकडून पाहणी दौरा*
-------------------------------------------------
 लोणी धामणी( प्रतिनिधी - कैलास गायकवाड ):-दि.१३/४/२०२२ एप्रिल :-  राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना २०१४-१५ आर्थिक वर्षात मंजूर असलेली मौजे धामणी पाणी पुरवठा योजनेची सद्यस्थितीत पाहणी आज पुणे जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्री प्रकाश खताळ यांनी धामणी येथे पाहणी केली. योजना ही येत्या दिवसांत पुर्ण होऊन दरवर्षी ऐन उन्हाळ्यात भासणाऱ्या धामणीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. तसेच टँकरने देखील पाणी पुरवठा करावा लागणार नाही.*

*सन २०१४-१५ आर्थिक वर्षात तांत्रिक मान्यता असलेल्या या धामणी नपापु योजना २०१७  साली चालू होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या योजनेत बिघाड झाल्याने मागील चार वर्षांपासून सदर योजना बंद होती. ही योजना सुरु करण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली होती. त्या अनुषंगावर कार्यकारी अभियंता श्री.खताळ व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या टीमसह कार्यस्थळावर पाहणी करून  देखभाल दुरुस्तीसाठी निधी तरतूद केली जाईल, असे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.*

*श्री खताळ म्हणाले, सदर योजनेची पूर्ण पाहणी केली असून लवकरच संबंधित योजनेच्या काही त्रुटी, देखभाल- दुरुस्ती मधून पूर्ण केल्या जातील. यासाठी  जिल्हा परिषदेकडून पूर्ण सहकार्य केले जाईल.*

*यावेळी पंचायत समितीचे सदस्य रवींद्र करंजखेले,  उपअभियंता श्री आर बी टोपे, शाखा अभियंता  श्री आर जी पाटील, श्री एस आर गांधी, सरपंच सागर जाधव, रामदास जाधव, सोसायटीचे चेअरमन सतीश जाधव, निलेश टेमकर, संदीप टेमकर, समीर मेंगडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment