पोलीस स्टेशन समोरील आवारात मारामारी करीत असलेल्या लोकांवर केला गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 14, 2022

पोलीस स्टेशन समोरील आवारात मारामारी करीत असलेल्या लोकांवर केला गुन्हा दाखल..

पोलीस स्टेशन  समोरील आवारात मारामारी करीत असलेल्या लोकांवर केला गुन्हा दाखल..

 आंबेगाव तालुका (प्रतिनिधी कैलास गायकवाड ):-ता.१२/४/२०२२ मंचर तालुका आंबेगाव येथील पोलीस स्टेशनच्या समोरील मोकळ्या जागेत मारामारी करीत असताना, गुन्ह्यातील इसमा वर  पोलिसांनी केली फिर्याद दाखल. आरोपी १ संजय वसंत राठोड २) त्याची पत्नी अर्चना संजय राठोड दोन्ही सध्या राहणार गणेशवाडी कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. मूळ राहणार लोंजे तांडा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव व इसम नामे लक्ष्मण सुरेश राठोड, संदीप सुरेश राठोड, गोरक्ष ताराचंद पवार, व महिला वाक्या बाई सुरेश राठोड सर्व राहणार सध्या भराडी  तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. मूळ राहणार ओरडे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव. या सर्वांनी पोलीस स्टेशनच्या समोरील मोकळ्या आवारात मोठ्यामोठ्याने आरडाओरडा करीत, व शिवीगाळ करत, एकामेकांना लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण करीत होते. व एकमेकांशी झोंबाझोंबी करत असताना आढळून आले. त्यांच्यावरती मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई फिरोज अब्दुल मोमीन  यांनी फिर्याद दाखल केली. भारतीय दंड विधान क  १६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घोडेगाव कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक हिले हे करत आहेत.

No comments:

Post a Comment