निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथे विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, April 25, 2022

निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथे विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा..!

निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथे विद्यालयात  माजी विद्यार्थी  मेळावा..!                                        निरगुडसर : प्रतिनिधी .प्रतिक अरुण गोरडे.:-दिः२५/०४/२०२२. निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील पं.ज.ने. माध्यमिक व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात १९९६-९७ च्या बॅचमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला.या वेळी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना डोळ्याच्या कडा कधी पान्हवल्या हे समजले सुद्धा नाही. मेळाव्याचे उद्घाटन शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील,माजी प्राचार्य बी.डी.चव्हाण,संस्थेचे संचालक प्रकाश तापकीर,माजी सरपंच रामदास वळसे पाटील,प्राचार्या सुनंदा गोरे,एच.एन.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सांगलीचे उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे, सुषमा खालकर-वळसे पाटील,प्रशांत लायगुडे डॉ.कुलदिप कोकाटे, नितीन मेंगडे,रेखा वळसे,आशू टाव्हरे, दिपाली तापकीर या माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते मांडताना वर्गातील भूतकाळ सर्वांन समोर मांडला. यावेळी प्रा.एस.जी.बोरकर,प्रा.सिमा शिंदे, प्रा.अरुण गोरडे यांनी आपली मनागते व्यक्त केली.यावेळी माजी विद्यार्थांनी आपल्या गुरुजनांचा यथोचित सन्मान केला.हा माजी विद्यार्थी मेळावा याशस्वी करण्यासाठी रामदास मिंडे,प्रकाश खिलारी,बाबाजी थोरात,संतोष टेमकर,नौशाद तांबोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व माजी विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक निलेश पडवळ यांनी केले.तर आभार रामदास मिंडे यांनी मांडले.

No comments:

Post a Comment