पोंदेवाडी ग्रामपंचायतला आदर्श पुरस्कार प्रदान* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 24, 2022

पोंदेवाडी ग्रामपंचायतला आदर्श पुरस्कार प्रदान*

*पोंदेवाडी ग्रामपंचायतला आदर्श पुरस्कार प्रदान*

पारगाव प्रतिनिधी (पियुष गायकवाड):- ता 24/04/2022 पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील ग्रामपंचायतला सरपंच परिषद मुंबई च्या वतीने आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती सरपंच अनिल वाळुंज यांनी दिली.
          सदर पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि 22 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार येथे पदमश्री पोपटराव पवार, आमदार सुरेश धस, आमदार प्रशांत बंब, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.  राज्यातील 29000 हजार ग्रामपंचायत मधून 5 ग्रामपंचायतिची निवड केली आहे. त्यात आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतिचा 3 रा क्रमांक आला आहे. यासाठी सरपंच परिषदेने काही निकषही लावले होते.
         राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व जि. प. माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी गावच्या विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिल्याने हा पुरस्कार मिळण्यास मदत झाल्याचे उपसरपंच महेंद्र पोखरकर यांनी सांगितले.
              पोंदेवाडी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मिळाल्याने पोंदेवाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पुरस्कार प्रसंगी संदीप पोखरकर, विठ्ठल मखर, संतोष पोखरकर, पोपट रोडे, कैलास गायकवाड, पांडुरंग ढमाले, दत्ता गोसावी, युवराज मांजरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment