बेल्हा - जेजुरी महामार्गावर अपघात - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 6, 2022

बेल्हा - जेजुरी महामार्गावर अपघात

बेल्हा - जेजुरी महामार्गावर  अपघात 
----------------------------------------  
लोणी धामणी -प्रतिनिधी:- ता.६ लोणी येथील 
बेल्हे (ता.जुन्नर) ते जेजूरी (ता.पुरंदर) रस्त्यावर लोणी (ता.आंबेगाव ) येथे लोणी पाबळ रस्त्यावर बांधन वस्ती येथे गुरुवार ( दिः०५) रोजी दुपारी तीन ते पाच वाजण्याच्या सुमारास इनोव्हा चार चाकी गाडीने येथील घराच्या भिंतीला जोराची धडक दिल्याने भिंतीला भगदाड पडले. एमएच-१४, ईएच-२४१८ हि इनोव्हा गाडी खेडवरून पाबळ-लोणी मार्गे पारगाव-शिंगवे येथे चालली होती.बांधन वस्ती येथे गाडीला अतिवेग असल्याने ड्रायव्हरचे गाडीवरील नियत्रंण सुटले व गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या उजव्या बाजूच्या घराला धडकली.धडक एवढी जोरदार होती कि घराच्या भिंतीला मोठे भगदाड पडले. गाडी मध्ये चारजण होते. एयर बॅग असल्याने चौघांना किरकोळ दुखापत झाली.अपघाताचे वृत समजताच पोलिस पाटील संदिप आढाव, शरद सहकारी बॅकेचे संचालक अशोक आदक पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष पडवळ, खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके यांनी अपघातस्थळी धाव घेतली व जखमींना तत्काळ लोणी येथील दवाखाण्यात दाखल केले. या रस्त्याने गेल्या वर्षभरात अनेकवेळा अपघात झाले.काहींना आपला जीवही गमवावा लागला. तरीही वाहानांचा वेग मात्र नियंत्रीत होताना दिसत नाही. याच सुमारास या रस्त्यावर लोणी येथील पैसा वस्ती येथे घरासमोरील शेडला पिकपने धडक दिली.मात्र कोणीही जखमी झाले नाही. रस्त्यावर ठिकाणी स्पीड बेकर बसवावेत अशी मागणी अशोक शिंदे यांनी केली. 

No comments:

Post a Comment