फसवणूक प्रकरणी शहापूर पोलीस स्टेशन कडून जाहीर आवाहन। - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 12, 2022

फसवणूक प्रकरणी शहापूर पोलीस स्टेशन कडून जाहीर आवाहन।


फसवणूक प्रकरणी शहापूर पोलीस स्टेशन कडून जाहीर आवाहन।
---------------------------------------------
प्रतिनिधी- शहापूर:-
फिर्यादी नामे सौ. लतिका एस मुकणे यांनी मौजे कळंभे शिवारात ता. शहापूर येथे हरिराज अपार्टमेंट मध्ये फ्लॅट बुक केला होता परंतु नमुद हरिराज अपार्टमेंट चे बिल्डर व आर्किटेक्ट 1) शेखर हरी पाटील  (बिल्डर) 2) निझार निरुद्दीन मिस्त्री (बिल्डर) 3) प्रशांत रमेश चव्हाण (आर्किटेक्चर) यांनी संगनमत करून फिर्यादी यांनी घेतलेल्या फ्लॅट मध्ये खरेदी खतामध्ये नमुद केल्या प्रमाणे सोई सुविधा न पुरविता फिर्यादी यांची फसवणूक केली आहे 
त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून शहापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 145/2022,भा द वि स कलम 420, 415, 418, 433, 504, सह मोफा कायदा कलम 3,7,10,11, प्रमाणे दिनांक 09/04/2022 रोजी गुन्हा दाखल आहे 
तरी वरील आरोपी बिल्डर व आर्किटेक्चर यांनी आणखी कोणत्या नागरिकांची फसवणूक केली असल्यास त्यांनी शहापूर पोलीस स्टेशन फोन नंबर : 02527- 272090 तसेच नमुद गुन्ह्याचे तपासी अंमलदार सहा. पोलीस निरीक्षक एन. एस. खैरनार , शहापूर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा किंवा समक्ष शहापूर पोलीस ठाण्यात हजर राहुन तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात येत आहे

No comments:

Post a Comment