शेतकऱ्यांच्या मुलाने आणल्या दहा नवीन मोटार कार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 11, 2022

शेतकऱ्यांच्या मुलाने आणल्या दहा नवीन मोटार कार...

शेतकऱ्यांच्या मुलाने आणल्या दहा नवीन मोटार कार...
_-------------------------------------
पारगाव प्रतिनिधी-पियुष गायकवाड :-
ता.१०/५/२०२२ लोणी तालुका आंबेगाव येथील शेतकऱ्याच्या मुलाने आणल्या दहा नवीन कार.
 नाथू काशिबा वाळुंज या शेतकऱ्याच्या मुलाने एकाच वेळी १० डिझायर नवीन कंपनीच्या गाड्या एकाच दिवशी लोणीमध्ये आणल्या. संतोष नाथू वाळूंज व त्याची पत्नी शोभा संतोष वाळुंज हे पुण्यामध्ये अष्टविनायक ट्रॅव्हल्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी चालवत आहेत. कोरोना महामारी मध्ये व्यवसायामध्ये मोठी मंदी आली होती. परंतु आता  नव्या जोमाने त्यांनी व्यवसाय सुरू केला असून. डिझायर कंपनीच्या दहा पांढऱ्या नवीन मोटर गाड्या लोणी मध्ये आणल्या. आपण घेतलेल्या गाड्यांचे पूजन लोणी मध्ये आई-वडील, ज्येष्ठांच्या हस्ते व्हावे ही भावना ठेवून, गाड्यांची पूजा  त्यांनी महादेव मंदिरा पुढे केली .वडील,भाऊ शेतीमध्ये काम करतात,संतोष व्यवसायानिमित्त पुण्यात असतो,गाड्या कंपन्यांना भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. पहिल्या ११ गाड्या असून व्यवसाय वाढीसाठी १०नवीन गाड्या आणल्या. यावेळी त्यांनी शंभू महादेवाच्या रंगकामासाठी दहा हजाराची रुपयांची, व शाळेच्या बांधकामासाठी पाच हजार रुपये देणगी दिली. आत्तापर्यंत त्यांनी गावासाठी अनेक वेळा सहकार्य केले असून पुढे सहकार्याची भावना व्यक्त केली. यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शरद  वाळुंज, माजी सरपंच उद्धवराव  लंके, समाज भूषण कैलास गायकवाड, सतीश थोरात, खरेदी-विक्री संघाचे तज्ञ संचालक चंद्रकांत गायकवाड, माजी उपसरपंच दिलीप आदक, संपत वाळुंज, धनु भाऊ आदक, हिरामण आदक,कोंडीभाऊ वाळुंज, नितिन दिवटे,  सुरेश वाळुंज,गावातील विविध मान्यवर व ग्रामस्थ हजर होते.
----------------------------------------
" गावातील एक शेतकऱ्याचा मुलगा दहा नवीन कार लोणी मध्ये आणतो व आपल्या व्यवसाय मध्ये इतरांनाही रोजगार निर्माण करून देतो शहरात राहून गावाकडे पण लक्ष ठेवतो अशा मुलाचा आम्हा शेतकऱ्यांना खूपच अभिमान वाटतो " असे भावना शेतकरी जगन्नाथ लंके, नाथु कारभारी वाळुंज यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment