सुर्यानगरीत(midc)रस्त्याची चाळन,जीवमूठीत घेऊन चालते रस्त्यावरची रहदारी..! बारामती:- बारामती येथील सुर्यानगरीतील अंतर्गत रस्त्याची अक्षरशः चाळन झालेली दिसत आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था तिथे झाल्याचे पहावयास मिळत आहे येथील रहिवाशांना या रस्त्यावरून ये जा करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागतंय वारंवार या रस्त्याबाबत येथील रहिवासी यांनी कल्पना देऊनही रस्त्याचे काम झाले नाही या भागात व्यावसायिक क्षेत्र झाल्याने गर्दी वाढत चालली असून वाहनांची ये जा सतत चालू असते अश्या वेळी रस्त्यातील खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले असून वयोवृद्ध व महिला, लहान मुले या खड्ड्यात पडले असल्याचे समजले, या रस्त्याने चालताना कसरत करावी लागते तरी याची त्वरित दखल घेऊन पाऊस चालू होण्याअगोदर कामे करावी नाहीतर या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आणि त्याचा अंदाज आला नाही तर एखादा अपघात होऊन जीवही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी लवकरात येथील अंतर्गत रस्त्याची कामे त्वरित करावी अशी मागणी येथील रहिवासी करीत आहे.
Post Top Ad
Tuesday, May 31, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
सुर्यानगरीत(midc)रस्त्याची चाळन,जीवमूठीत घेऊन चालते रस्त्यावरची रहदारी..!
सुर्यानगरीत(midc)रस्त्याची चाळन,जीवमूठीत घेऊन चालते रस्त्यावरची रहदारी..!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment