यंदा विठ्ठलाच्या महापुजेला नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार ... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 30, 2022

यंदा विठ्ठलाच्या महापुजेला नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार ...

यंदा विठ्ठलाच्या महापुजेला नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार ...                                   मुंबई:- विठ्ठलाच्या महापुजेला एकनाथ शिंदे जाणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापुजा केली जाते. यंदाच्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापुजा होणार आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ
शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेनंतर पांडुरंगाच्या महापुजेला एकनाथ शिंदे जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.राज्यातील सत्तानाट्य पाहता आषाढी वारी सुरू असून पंढरपूरला एकादशीला विठ्ठलाची पूजा कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत होता.एकनाथ शिंदें बंड पुकारल्याने देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि विठ्ठलाची पूजा करतील अशी चर्चा रंगली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. यंदा आषाढी एकादशी 10 जुलै रोजी आहे.आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय पूजेची प्रथा संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सुरू झाली. मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची महापूजा करण्याचा पहिला मान तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण
यांना प्राप्त झाला होता. त्यांच्यासह राज्यातील 16 मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत आषाढी एकादशीची
शासकीय महापूजा केली आहे. ही पूजा करणारे उद्धव ठाकरे सतरावे मुख्यमंत्री, ठरले तर एकनाथ शिंदे आठरावे मुख्यमंत्री आहेत.

No comments:

Post a Comment